Railway Accident | बडनेराजवळ मालगाडीचे १९ डब्बे लोहमार्गावरुन घसरले; दिवाळीला घरी पोहचणारे प्रवासी वाटेत लटकले, ४ गाड्या रद्द, २६ गाड्या वळविल्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Railway Accident | कोळसा घेऊन जाणार्‍या मालगाडीचे तब्बल १९ डब्बे बडनेरा जवळील टीमटाहा ते मालखेड दरम्यान लोहमार्गावरुन घसरले. त्यामुळे नागपूर विभागात तसेच बडनेरा रेल्वे स्थानकादरम्यान अनेक गाड्या वाटेत खोळंबल्या आहेत. दिवाळीला घरी पोहचण्यासाठी निघालेले शेकडो प्रवासी वाटेतच लटकले आहेत. या मुळे नागपूर भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चार गाड्या रद्द करण्यात आल्या असून २६ गाड्या अन्य मार्गावरुन वळविण्यात आल्या आहेत. (Railway Accident)

 

 

नागपूरवरुन बडनेरा कडे कोळशाने भरलेल्या मालगाडीचे १९ डब्बे टीमटाळा ते मालखेड रेल्वे ट्रॅकवर रविवारी रात्री साडेअकरा वाजता घसरले. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक थांबविली आहे. त्यामुळे २६ गाड्या नरखेडसह अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. (Railway Accident)

 

कोळशाने भरलेले हे डब्बे उचलण्याचे काम रात्री सुरु असलेली घसरलेल्या डब्ब्यांची संख्या लक्षात घेता, हे काम कधी पूर्ण होईल आणि पुन्हा वाहतूक कधी सुरु होऊ शकेल, हे अद्याप सांगता येणार नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

 

Web Title :- Railway Accident | 20 loaded coal wagons derailed b/w Malkhed &Timatla
stations on Wardha-Badnera sections,Nagpur at around 23.20hrs on Oct 23,resulting in Dn&Up line affected on this section.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा