मुख्यमंत्र्यांचा अवघ्या दीड मिनिटात घटनास्थळावरुन काढता पाय

अमृतसर : वृत्तसंस्था – अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात 61 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा जास्त यात जखमी झाले आहेत. अमृतसरच्या दिशेने भरधाव वेगात ही रेल्वे जात होती. आता राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या अपघाताच्या 16 तासांनंतर घटनास्थळाला भेट दिली. आश्चर्याची गोष्ट अशी की, अवघ्या दीड मिनिटातच सुरक्षारक्षकांच्या गराड्यात अमरिंदर सिंह आपली भेट आटोपली. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार आणि मंत्री नवज्योत सिंह सिद्धू हे देखील उपस्थित होते.

रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

रेल्वे अपघातानंतर नागरिकांकडून चांगलाच संताप व्यक्त कला जात आहे. इतकेच नाही तर घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी सुरु होती. सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यात घटनास्थळी दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांना रेल्वे रुळापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपली भेट आवरावी लागली.  दीड मिनिटातच त्यांनी तेथून पाय काढला.

अपघातानंतर 16 तासांनी घटनास्थळी भेट दिल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, “मी इस्रायल दौऱ्यावर जात होतो. दिल्ली विमानतळावर मला अपघाताची माहिती मिळाली. दौरा रद्द करुन मी इथे आलो. जर मी काल इथे आलो असतो, तर सगळ्या अधिकाऱ्यांना व्हीव्हीआयपीची व्यवस्था करावी लागली असती, त्यामुळे मोठा गोंधळ झाला असता.”

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले – राष्ट्रवादी नेते

या रेल्वे अपघाताबाबत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, “एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतरच या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण हे स्पष्ट होईल.” “तसंच नवज्योतसिंह सिद्धू यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांनाही अपघाताचं दु:ख आहे,” असंही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले.

कसा झाला अपघात?

जोडा फाटक परिसरात रावण दहन आणि फटाके फुटल्यानंतर गर्दीपैकी काही लोक रेल्वे रुळावर आले. रुळावर आधीपासूनच मोठ्या संख्येने लोक रावण दहन पाहत होते. संध्याकाळी सातच्या सुमार जोडा फाटकवरुन डीएमयू ट्रेन आली. ही डीएमयू ट्रेन जालंधरहून अमृतसरला जात होती. ही भरधाव ट्रेन रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवत निघून गेली. रावण दहनाच्या वेळी फटाक्याच्या आवाजामुळे ट्रेन आल्याचं समजलं नाही आणि हा दुर्दैवी अपघात झाला.