Thane : मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन महिलेचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे(Railway) स्थानक आणि मुंब्रा रेल्वे (Railway) स्थानकादरम्यान शनिवारी (दि. 29) सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान राज्यात लॉकडाऊनमुळे कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. अशातच चोरट्याने लोकलमध्ये शिरुन महिलेचा जीव घेतल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘नेमकं चाललंय काय? मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्राकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

विद्या पाटील असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली आहे.

Property Tax : पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवली; आतापर्यंत 736 कोटींचे विक्रमी उत्पन्न

प्राप्त माहितीनुसार, विद्या पाटील शनिवारी संध्याकाळी लोकलने प्रवास करत होत्या. त्याचवेळी लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ 5 महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होताना एका चोरट्याने लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. विद्या पाटील यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मुंलींच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी खुली नसतानाही चोरटा लोकलमध्ये आलाच कसा असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

Driving License : आता घरबसल्या बनवा तुमचं लर्निंग लायसन्स, जाणून घ्या

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

लसीकरणाच्या मुद्द्यावरुन SC ने मोदी सरकारला पुन्हा फटकारले, म्हणाले – ‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला, 20 जूननंतर प्रकरणांमध्ये होईल वेगाने घट