
Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांसाठी होणार भरती, परीक्षेविना थेट नियुक्ती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Railway Recruitment 2021 | भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती (Railway Recruitment 2021) घेण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची एक खास सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 339 अप्रेंटिस पदांची भरती घेतली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण (Passed 10th) उमेदवारांसाठी यात एक मोठी संधी आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.
पदे – 339 अप्रेंटिस
– वेल्डर
– सुतार
– फिटर
– इलेक्ट्रीशियन
– स्टेनो
– वायरमन
– इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
– मेकॅनिक डिझेल
शैक्षणिक पात्रता –
– 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेड/क्षेत्रातील ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयाची अट –
– 15 ते 24 वर्षे
निवडप्रक्रिया –
– 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
असा करा अर्ज –
इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट apprenticeship.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2021
Web Titel :- Railway Recruitment 2021 | rrb secr recruitment 2021 339 posts check details here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mumbai Rape Case | बलात्कार करुन तरुणीच्या गुप्तांगात टाकला रॉड, मुंबईतील संतापजनक घटना
Pune Police | पुणे पोलिसांनी तत्परता ! वाट चुकलेल्या 6 वर्षीय ‘अक्सा’ला केलं आईच्या स्वाधीनं