Mumbai Rape Case | बलात्कार करुन तरुणीच्या गुप्तांगात टाकला रॉड, मुंबईतील संतापजनक घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइनदिल्लीमध्ये 9 वर्षापूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे (Nirbhaya case) देशात मोठी खळबळ उडाली होती. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या (Mumbai Rape Case) साकीनाका (Sakinaka) परिसरात घडली आहे. एका तरुणीवर बलात्कार (Mumbai Rape Case) करुन तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना आर्थिक राजधानीत घडली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातही बलात्काराच्या (Rape In Pune) घटना समोर आल्या होत्या.
त्यानंतर आज मुंबईत घडलेल्या घृणास्पद कृत्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईत एका 30 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला.
तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंतर्गत अवयवांना जखमा (Internal Injury) झाल्या आहेत. त्याशिवाय आरोपींनी तिच्या गुप्तांगात रॉड घातल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सध्या महिलेवर शस्त्रक्रिया सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील साकीनाका परिसरातील आहे.
येथे एका आरोपीने तुरणीवर बलात्कार केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला.
याबाबत माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याविरोधात 307,376,323,504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : mumbai rape case | after rape he put a rod in the private part of the girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | पुणे पोलिसांनी तत्परता ! वाट चुकलेल्या 6 वर्षीय ‘अक्सा’ला केलं आईच्या स्वाधीनं

Crime News | बिल्डर निशांत कदम हत्या प्रकरण : पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांच्या मुसक्या आवळल्या

Devendra Fadnavis | पोलिस निरीक्षकाची पत्रकारांवर आरेरावी, फडणवीस यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा (व्हिडिओ)