Raima Islam Shimu | प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू बांगलादेशात बेपत्ता, पोत्यात सापडला मृतदेह

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Raima Islam Shimu | बांगलादेशची प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (Raima Islam Shimu) अचानक बेपत्ता झाल्यानंतर आता तिचा मृतदेह (Dead Body Of Raima Islam Shimu) राजधानी ढाक्याच्या (Dhaka) हद्दीत सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह सोमवारी केराणीगंजमधील हजरतपूर (Hajratpur) पुलाजवळ एका गोणीत सापडला होता. विशेष म्हणजे, रायमा इस्लाम शिमू या पूर्वी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी कलाबागन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने केराणीगंज मॉडेल स्टेशनमधून मृतदेह ताब्यात घेतला आणि आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

ढाका पोलिसांनी सांगितले की, रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर सलीमुल्ला मेडिकल कॉलेज (Salimulla Medical College) रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोमवारी सकाळी ढाक्याच्या केरानीगंजमधील आलियापूर भागात हजरतपूर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. मृतदेह एका गोणीत ठेवण्यात आला होता. अभिनेत्रीच्या मानेवर जखमेच्या खुणा असल्याने खुनाची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्रीचा पती आणि तिच्या मित्रासह सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

रायमा आपल्या कुटुंबासोबत ढाक्यातील ग्रीन रोड येथे राहत होती. तिच्या कुटुंबात पती आणि दोन मुले आहेत.
रविवारी सकाळी जेव्हा रायमा शूटिंगसाठी घरातून निघाली होती, मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ती परतली नाही, तेव्हा कुटुंबीयांनी कलाबागन पोलिस ठाण्यात तक्रार केली.
35 वर्षीय अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूने 1998 मध्ये ‘बार्तामन’ (Bartaman) या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती
आणि तिने आतापर्यंत 25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या बांगलादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्याही होत्या.
चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही नाटकांमध्येही अभिनय केला आणि निर्मिती केली.

 

Web Title :- Raima Islam Shimu | famous actress raima islam shimu went missing in bangladesh body found in sack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोन्याचा भाव स्थिर तर, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

 

Criminal Lawyer Shrikant Shivade | ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे पुण्यात 67 व्या वर्षी निधन; बॉलीवूडमधील कलावंतांचे वकील म्हणून होते प्रसिद्ध

 

Mumbai Local Mega Block | मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगा ब्लॉक; 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम