Rain in Maharashtra | मुंबईसह पुण्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता; आगामी 48 तासांसाठी कोकणात Red alert

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Rain in Maharashtra । मागील काही दिवासापासून महाराष्ट्रात पावसानं दाणदाण केली आहे. सर्वच जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईत तर पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पाऊस बरसत आहे. तर आज दुपारी चार पासून मुंबईत (Mumbai) पाऊस (Rain) आणखी जोर धरणार आहे. मुंबईस पुण्यातही जोरदार पाऊसाची शक्यता हवामान खात्याकडून (Weather department) वर्तवण्यात आली आहे. उद्या सकाळी साडेआठ पर्यंत मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार (Rain in Maharashtra) असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे हवामान विभागाकडून मुंबईला अलर्ट दिल आहे. तसेच मुंबईसहित 7 जिल्ह्यात रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे.

आज (बुधवारी) मुंबईसह (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सातारा (Satara) या जिल्ह्यांना हवामान खात्याने (Weather department) रेड अलर्ट (Red alert) दिला आहे. म्हणून आज कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रातील घाट ठिकाणी मुसळधार पावसाला जोर धरणार आहे. यातच पावसासह ढगांसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे. तसेच, आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नाशिक या 3 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. मात्र, कोकण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आगामी 48 तासांसाठी कोकणाला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे.

दरम्यान, मुंबई कोकण भागासह आता मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
याबरोबरच मराठवाड्यात देखील मध्यम पावसाची सुरुवात होणार आहे.
मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याच्या परिसरात देखील हवामान खात्याने (Weather department) रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे.
या दरम्यान, उद्या सकाळी साडे आठ वाजल्यानंतर मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange alert) असणार असल्याची माहिती.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शुभांगी भुते (Shubhangi Bhute) यांनी दिलीय.

Web Title : Rain in Maharashtra | imd give red alert to konkan for next 48 hours possibilities on very heavy rainfall in mumbai and pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jammu Kashmir Police | … म्हणून भाजप नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; भाजप नेत्यांसह चौघांना अटक

BJP And MNS | ‘भाजपा- मनसे युतीचे वारे? ‘माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो’; जाणून घ्या कोण-कोणाला काय म्हणालं

Nashik Crime | मित्रानेच केला घात; गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार