सीआरपीएफच्या कारवाईत ५०० माओवादी समर्थक ताब्यात 

रायपूर : वृत्तसंस्था

वेगवेगळ्या राज्यांमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफकडून माओवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्यात आली आणि या कारवाई अंतर्गत गेल्या वर्षभरात एकट्या छत्तीसगडमध्ये माओवादी समर्थक असलेल्या ५०० जणांना सीआरपीएफनं ताब्यात घेतले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिदेशक आर.आर.भटनागर यांनी कारवाई संदर्भातील माहिती दिली आहे.

सीआरपीएफनं देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये माओवाद्यांविरोधात दोन हात करण्यासाठी दहा लाख सशस्त्र सैन्य तैनात केले आहे. भटनागर यांनी सांगितले की, आम्ही गावागावात जाऊन माओवादी समर्थकांविरोधात कारवाई करत आहोत. माओवादी समर्थक, कार्यकर्ते आणि त्यांना माहिती पुरवणारी स्थानिक जनता या सर्वांविरोधात कारवाई करण्यात येईल, या दिशेनं आम्ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरात आम्ही  ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, माओवाद्यांना होणारा रसदपुरवठा कमी व्हावा, या दृष्टीकोनातून कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘या’ कारणास्तव रिझर्व्ह बँकेकडून ८.४६ टन सोने खरेदी

[amazon_link asins=’B01KSXQNLS,B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4445f9b2-b00d-11e8-9e11-35fb14385847′]

छत्तीसगडमध्ये विशेष अभियान दलाचे नेतृत्व करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, ”सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा कट रचणे, नक्षलवाद्यांना सहकार्य करणे आणि नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होणे, या सर्व घटनांमध्ये नक्षलवाद्यांना मदत करणारी मंडळी सीआरपीएफच्या रडारवर होती. या लोकांची पाळेमुळे अधिक खोलवर रूजू नयेत यासाठी त्यांच्यावर नजर ठेऊन त्यांच्याविरोधात धडक  कारवाई करण्यात आली आहे.

बॉम्बे टॉकीज जवळ असणाऱ्या गोदामात आग