राहुल गांधींनी पारंपरिक टोपी घालून केलं आदिवासी लोकनृत्य ! (व्हिडीओ)

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.

या महोत्सवाचा माहोल पाहिल्यानंतर राहुल गांधी हे देखील आदिवासी नृत्य माढियावर थिरकताना दिसले. या वेळी काही कलाकारांनीही त्यांना साथ दिली. यावेळी त्यांनी पारंपरिक टोपी घातली आणि मान्दर नावाचं वाद्यही वाजवलं. राहुल गांधी थिरकत असताना पूर्ण मैदानात त्यांच्या नावाचा जयघोष झाला. यावेळी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पीसीसी चीफ मोहन मरकाम यांनीही नृत्य करताना राहुल गांधींना साथ दिली.

यावेळी या कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी म्हणाले, “छत्तीसगडमधील सरकार प्रत्येक वर्गासाठी काम करत आहे. आदिवासी आणि गरीबांवर त्यांचा फोकस आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अनेक राज्य सध्या जळत आहे. परंतु छत्तीसगड शांत आहे. यावरून कळतं की, सरकार किती चांगलं काम करत आहे. आदिवासी नृत्य आणि संगीत जाणून आणि समजून घेण्यासाठी ही चांगली संधी आहे. एका मंचावरून देशभरातील आदिवासी कला आणि परंपरा जाणून घेण्यासाठी संधी आहे.

मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले, “राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसारच काँग्रेस सरकार करत आहे. शेतकरी कर्जमाफी, आदिवासींच्या हितासाठी जमीन तसेच इतर अनेक निर्णय राहुल गांधींच्या इच्छेनुसारच झाले आहेत. केद्र सरकारला देशातील एकता नष्ट करायची आहे.” असं ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/