राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडचे शो मॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे मुंबईत दीर्घआजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून कृष्णा राज कपूर आजारी होत्या. सोमवारी पहाटे त्यांनी अंतिम श्वास घेतला. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ea4c97c-c536-11e8-b33b-95e6193f8da0′]

कृष्णा यांना गेल्या आॅगस्टमध्ये मुंबईतील एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली होती. कृष्णा यांना पाच मुले. यात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा व रितू यांचा समावेश आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर , रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत. ८७ वर्षांच्या वयातही कृष्णा ब-याच सक्रीय होत्या. फॅमिली पार्टी आणि अनेक चित्रपटाच्या प्रीमिअरला त्या हजेरी लावत. १९८८ मध्ये राज कपूर यांचे निधन झाले. यानंतर कृष्णा यांनीच संपूर्ण घराला आधार दिला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92f251a7-c536-11e8-a674-9db1a4b60bce’]

बॉलिवूडच्या अनेकांनी कृष्णा राज कपूर यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री रवीना टंडन, अनुपम खेर यांनी ट्विटरवर कृष्णा राज कपूर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे महिलेची वाहनातच प्रसूती

हिंगोली : जिल्ह्यातील देवजना येथील सावित्रा संजय कल्याणकर या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच तिची प्रसुती झाली. खड्डेमय रस्त्यांमुळे आणि गर्भवतीची अवस्था नाजूक असल्याने चालकास वाहन सावकाश चालविण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास अशीर झाला आणि महिलेची वाहनातच प्रसूती झाली.

[amazon_link asins=’B078124279,B0784D7NFX,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc539466-c536-11e8-980f-89a02a5ffe5f’]

हिंगोलीच नव्हे तर राज्यातील अनेक रस्त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी हे अभियानही सुरू केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यातील रस्ते हे खड्डेमुक्त असल्याचा ठाम दावा करत आहेत. तर दुसरीकडे नागरिकांना खराब रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय qहगोलीत आला आहे. सावित्रा यांना २९ सप्टेंबरला सकाळी पावणे दहाच्या सुमारास खाजगी गाडीने आखाडा बाळापूर येथील प्राथमिक रुग्णालयाकडे नेण्यात येत होते. देवजना फाटा ते शेवाळा यादरम्यान मोठ्या प्रमाणात रस्ता खराब  झालेला आहे. सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी या रस्त्यावरून येत असताना गर्भवती  महिला रस्त्यातच बाळंत झाली. तिने या क्रूजर गाडीमध्येच गोंडस मुलाला जन्म दिला. रस्त्यातच महिलेची प्रसूती झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक घाबरले होते. गाडी तशीच बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. बाळ व बाळंतणीला रुग्णालयात नेल्यानंतर दोघांचीही तपासणी करून बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे गाडी हळू चालवत असल्याचे चालक राजू गाडे यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1b301cd-c536-11e8-b14c-cf04a24711df’]

महिलेची प्रसूती झालेल्या ठिकाणाहून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावरच आखाडा बाळापूर येथील रुग्णालय होते. जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची भयंकर स्थिती झालेली आहे. काही भागात अर्धवट अवस्थेत रस्ते आहेत, तर काही ठिकाणी नव्यानेच बनविलेले रस्ते पूर्णतः उखडले आहेत. अशा खड्डेमय रस्त्यावरून गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जावे लागत आहे.