Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोमवारी रात्री अटक (Raj Kundra arrested) केली आहे. अश्लिल चित्रपट (pornography movie) बनवून ते मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे प्रसारित केल्याप्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तो मुख्य सुत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने राज कुंद्राला अटक करण्यात आली (Raj Kundra arrested) आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 20 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्लिल चित्रपट (pornography movie) बनवणे आणि ते वेगवेगळ्या ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रसारित करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात या अगोदर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे राज कुंदा याला अटक करण्यात आली आहे.

एक बेकायदेशीर अ‍ॅप बनविले होते. त्यावर अश्लिल चित्रपट (pornography movie) प्रसारित केले जात होते. हॉटशॉट नावाचे हे अ‍ॅप बनविले होते. त्यावर चित्रपट प्रसारित होत.
त्यानंतर लोकांकडून पैसे घेऊन त्यांना त्याचा एक्सेस दिला जात होता.
बॉलीवूडमध्ये कामाच्या शोधासाठी येणार्‍या गरजवंत तरुणींना या कामात फसवले जात होते.  मोठ्या चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने अश्लिल चित्रपटात (pornography movie) काम करवून घेतली जात होती.

मालाड पश्चिम येथील मढगावमधील एका बंगल्यावर सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकाने छापा घातला.
तेव्हा तेथे अश्लिल चित्रपटाचे (pornography movie) शुटिंग सुरु होते.
त्यातून हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला होता.

Web Title : Raj Kundra Arrested | actress shilpa-shettys-husband-raj-kundra-arrested-in-pornography-case

 

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ