Raj Kundra च्या सपोर्टसाठी आली गहना वशिष्ठ, म्हणाली – ‘ते नॉर्मल व्हिडिओज आहेत जसे एकता कपूर ‘गंदी बात’ बनवते’

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला सोमवारी मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. राजवर अश्लील चित्रपट (Porn Video) बनवणे आणि ते अ‍ॅप्सवर अपलोड करण्याचा आरोप आहे. अटकेनंर आज कोर्टात राजला हजर करण्यात आले, ज्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कस्टडीत पाठवले आहे. राज (Raj Kundra) च्या अटकेच्या वृत्ताने सोशल मीडियापासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणावर सोशल मीडियावर लोक राजविरूद्ध आपला संताप व्यक्त करत आहेत तर काहीजण
त्याची थट्टाही करत आहेत. या दरम्यान गंदी बात अ‍ॅक्ट्रेस गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) चा
एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती राजचे समर्थन करत आहे. गहनाचा व्हिडिओ सोशल
मीडियावर वेगाने वायरल होत आहे, ज्यामध्ये ती राजची बाजू मांडत आहे आणि सांगत आहे की, ते
व्हिडिओ अश्लील नव्हते.

व्हिडिओमध्ये गहना (Gehana Vasisth) म्हणते, मला राजच्या अटकेबाबत समजले, मला केवळ एवढेच म्हणायचे आहे की कोणतेही पोर्न बनवले जात नव्हते, कुणीही घाणेरडा व्हिडिओ (Porn Video) बनवत नव्हते. नॉर्मल व्हिडिओ होते, जसे एकता कपूर ’गंदी बात’ (Gandi Baat) बनवते आणि ‘पार्च्ड’ माहिती नाही किती चित्रपट आहेत. या सर्व सीरिजपेक्षा त्यामध्ये कमी बोल्डनेस आहे.

Pune Crime | दुचाकी आणि जबरी चोरी करणार्‍या दोघांना अटक, 3 दुचाकीसह दोन लाखाचा माल गुन्हे शाखेकडून जप्त

Raj Kundra | gandii baat actress gehana vasisth support raj kundra says those videos are just erotic like ekta kapoor gandii baat

माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ बघितल्याशिवाय जज करू नका, अगोदर व्हिडिओ पहा,
कारण त्यापैकी कोणताही असा व्हिडिओ नाही, जो अश्लीलतेच्या कॅटेगरीत येतो. सर्व 18 वर्षाच्या
वरील लोकांना अश्लील आणि इरॉटिक व्हिडिओ (Erotic Videos) मध्ये फरक समजतो. केवळ
कव्हर पाहून हे ठरवू नका की ते अश्लील व्हिडिओ आहेत.

बाकी मला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, ते चुकीचे करणार नाहीत. गोष्टी चुकीच्या दाखवल्या जाऊ
नयेत, जे सत्य आहे, ते दाखवले जावे. ते केवळ नॉर्मल बोल्ड व्हिडिओ आहेत, जे अनेक लोक
बनवत आले आहेत आणि बनवतात. माझी सर्वांना विनंती आहे की, इरॉटिक (Erotic) ला पोर्नशी मिक्स करू नका.

दरम्यान, राज कुंद्राला त्याच केसमध्ये अटक केली आहे, ज्यामध्ये गहन वशिष्ठला सुद्धा अटक झाली होती आणि तिला 5 महिने जेलमध्ये सुद्धा राहावे लागले होते. मात्र, गहना जामीनावर बाहेर आली आहे.

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 7,510 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Raj Kundra | gandii baat actress gehana vasisth support raj kundra says those videos are just erotic like ekta kapoor gandii baat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update