Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच; पुन्हा एकदा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पॉर्नोग्राफी व्हिडिओ (Pornography) प्रकरणात राज कुंद्राच्या (Raj Kundra Porn Film Case) अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीसंदर्भात आणि काही अँप्सद्वारे उघडकीस आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा (Raj Kundra Porn Film Case) आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पने जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज कुंद्राला आणखी काही दिवस तुरुंगातच रहावे लागणार आहे.

याशिवाय राज कुंद्राच्या (Raj Kundra) प्रकरणात आणखी एक महत्वाची बातमी समोर आलीय. पॉर्न फिल्म (Porn movie) बनवणं आणि ते प्रसारित करणे असा गंभीर आरोप राज कुंद्रावर आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर विविध प्रकारचे आरोप देखील करण्यात आले आहे. म्हणून राजचे पाय आणखी खोलात रुतल्याची शक्यता देखील आहे. त्याच्या या प्रकरणाचा फटका पत्नी शिल्पाला देखील बसला आहे. शिल्पाला देखील चौकशीला सामोर जावं लागणार आहे. आता तिची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. दुसरीकडे त्यांचे बँक अकाउंटसही बंद केलं आहे.

दरम्यान या अगोदर मंगळवारी (27 जुलै) रोजी मुंबईच्या फोर्ट न्यायालयाने राज कुंद्राला 14 दिवस
न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान
पोलिसांनी राज कुंद्राला 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. राज कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक
महिंद्रा बँकेचे डेबिट खाती गोठविली गेली आहेत, अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे. या
दरम्यान, राज कुंद्रानं (Raj Kundra) हॉटशॉट नावाच्या अ‍ॅपच्या जाहिरातीसाठी मोठी रक्कम
मोजली होती. ती होती 34 कोटी इतकी. एका पोलीस अधिकाऱ्याचे असे म्हणणे आहे की, त्यांना
कुंद्राच्या फोनमधून वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली आहे. जी तपासात अतिशय महत्वाची
आहे.

हे देखील वाचा

Sangli News | पुराबरोबर आलेली मगर पाणी ओसरल्यानंतरही घराच्या छतावरच अडकून राहिली

Maharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  raj kundra porn film case | high court rejects bail pleas of raj kundra and ryan thorpe in pornography case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update