MNS Chief Raj Thackeray | ‘कुणाशी युती नको, कुणाशी भानगडी नको’, राज ठाकरेंचा ‘एकला चलो’चा नारा’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर (Konkan Tour) असून त्यांनी दापोली, चिपळून आणि खेड मधील मनसे कार्यकर्त्यांशी पक्षबांधणी संदर्भात संवाद साधला. खेडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका (Municipal Council Elections) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली. तसेच खेडमधील जनता मनसेच्या उमेदवारांना नक्की साथ देईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

 

महाराष्ट्रातील जनता (Maharashtra Political News) त्यांचा राग व्यक्त करते का, की पुन्हा पैशांच्या तमाशावर विकली जातेय. पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी होणार असतील अन् तुम्ही त्यांनाच मतदान (Voting) करत असाल तर त्याला काही अर्थ नाही, असे राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटले.

 

जनतेने विचार केला पाहिजे

राज्यात जे काही चालले आहे ते पाहून आनंद वाटत असेल तर भोगा. मी राज ठाकरे सतत जे सांगत आहे हे फक्त वर्तमानापुरतेच नाही तर भविष्यात येणाऱ्या पिढ्या काय पाहणार आहेत याचा विचार करा. जो या सगळ्या लोकांनी चिखल केला त्यात सर्वांना घालायचं की नवनिर्माण करायचं याचा विचार जनतेने केला पाहिजे. याबद्दल मला जे काही जनतेशी बोलायचं आहे ते मी बोलेनच, असेही राज ठाकरे म्हणाले.

 

राज ठाकरेंचा ‘एकला चलो’चा नार’

मला तुमची साथ हवी आहे, ऐन मोक्याच्या वेळी सर्वांची साथ हवीय. मला एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत झालं ते झालं आता नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. कोणाच्या युत्या नको तसल्या भानगडीच नकोत. खेडमध्ये नगरपरिषदेत निश्चितच खेडमधील जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

 

कोकणातला रस्ता का होत नाही?

खेडमधील मतदारांना उद्देशून राज ठाकरे पुढे म्हणाले,
अनेक वर्षांपासून तुम्ही मतदानाला जाता. रांगेत उभं राहता.
अनेक आमदार-खासदार निवडून देता. अनेकदा तेच तेच लोक पुन्हा निवडून देता.
पण यावेळी मतदान करताना आपल्या मनाला एक प्रश्न विचारा, 17 वर्षे झाली तरी आपल्या कोकणातला रस्ता का होत नाही? समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) जर साडेचार वर्षात पूर्ण होत असेल तर आपल्या कोकणातला रस्ता 17 वर्षे झालं तरी पूर्ण का होत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.

 

 

Web Title : Raj Thackeray | mns-Chief-raj-thackeray-is-on-konkan-tour-and-he-said-while-addressing-the-
people-that-i-want-your-support-while-speaking-in-the-khed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा