Devendra Fadnavis | ‘हम छेडते नही… छेडा तो छोडते नही…, दगाबाज्यांना माफी नाहीच’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप महाविजय 2024 प्रशिक्षण कार्यशाळेत (BJP Mahavijay 2024 Training Workshop) बोलताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कृतीला बेईमानीशिवाय दुसरं काही बोलता येत नाही. हम छेडते नही…छेडा तो छोडते नही…,दगाबाज्यांना माफी नाहीच, हा आमच्यावर शिवरायांचा संस्कार आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना एकप्रकारे इशारा दिला आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, आज देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदी नको अशी भावना मांडत आहेत. मोदींनी (PM Narendra Modi) काय केले देशाला 11 वरुन 5 व्या क्रमांकावर आणले. गरीबी कमी केली, हे आयएमएफ (IMF) म्हणतोय. जगात सर्वात जास्त नोकऱ्या या भारतात तयार होत आहेत. मोदींच्या नेतृत्वाने करुन दाखवले आहे. आज सगळे लोक मोदींविरोधात येतायत तेव्हा असे म्हणून चालणार नाही, की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही. जे येतील त्यांना सोबत घेणार आहोत. आमचे दरवाजे खुले आहेत. एक गोष्ट सांगतो, काँग्रेसचा (Congress) विचार चालणार नाही, तुष्टीकरणाचे विचार आहेत. आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. एमआयएम (MIM), मुस्लिम लीगला (Muslim League) सोबत घेऊ शकत नाही.

 

आमच्यासाठी राष्ट्र प्रथम

ही जी तुष्टीकरणाची निती आहे, ज्यामुळे भारताचे विभाजन (Partition of India) झाले. का भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) दोन देश झाले. त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची निती ठेवली, यामुळे दोन देशांचा सिद्धांत मांडला गेला आणि देशाचे विभाजन झाले. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. आम्ही 22 पक्षांचे सरकार चालवले आहे. बावकुळे (Chandrashekhar Bawankule) काळजी करु नका, दुसऱ्यांचे स्वागत करताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे ती तुम्ही कुठेही वाया घालवू देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

 

आता रामायणही झाले पाहिजे

महाभारत झाले तर रामायणही झालेच पाहिजे. काल परवा आमचे विद्वान मित्र नाना पटोले
(Nana Patole) म्हणाले की अजित पवार (Ajit Pawar) बिभीषण आहेत.
मला खूप आनंद झाला. पवार जर बिभीषण आहेत, आणि आमच्याकडे आले तर आपण कोण आणि ज्यांच्याकडून आलेत ते कोण? असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. बिभीषण देखील रामाकडे आले तेव्हा वानर देखील होते. ते म्हणाले कशाला घेता, आपल्याकडे एवढे वीर आहेत. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की, त्यांच्या आल्याने तिथली बातमी मिळेल हे खरे आहे. पण त्यांच्या येण्याने रावण मनातून पराभूत होईल. जो नेता मनातून पराभूत होतो तो विजयी होऊ शकत नाही. मी फक्त दाखले देतोय, मी कोणाला रावण, बिभीषण म्हणत नाही. मी संजय राऊत (Sanjay Raut) नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

 

हम छेडते नही…छेडा तो छोडते नही…

सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज देऊ शकत नाही. जसे 2019 मधील उत्तरे 2023 मध्ये मिळाली,
तशी 2023 ची उत्तरं 2026 पर्यंत नक्की मिळतील. फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती,
हम छेडते नही…छेडा तो छोडते नही…, शिवरायांनीच आपल्याला सांगितले आहे दगाबाजांना माफी नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

 

288 मतदारसंघात काम करायचे आहे

152 आकडा हा बावनकुळेंमुळे आला की नाही मला माहिती नाही.
शिवसेनेसोबतची युती 151 मुळे तुटली होती. आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray)
आकडा जाहीर केलेला आणि आम्ही एवढ्या खाली सीटा घेणार नाही असे म्हटले त्यामुळे झाले होते.
फक्त एवढे सांगतो की तुम्हाला इतक्या सीट लढण्यासाठी नक्की देऊ की 152 हा आकडा पूर्ण करता येईल. आपल्याला 288 मतदारसंघात काम करायचे आहे, आपल्यालाही जिंकायचे आहे, आपल्या मित्रांनाही जिंकवायचे आहे. भाजप बेईमान नाहीय, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Web Title : Devendra Fadnavis | bjp will get more than 152 seats in upcoming vidhansabha to fight devendra fadnavis announced in meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jawan Movie | नयनताराच्या पतीने दिली जवान चित्रपटाबाबत मोठी अपडेट; बायकोचे कौतुक करताना दिला स्पॉइलर

Tamanna Bhatia | तमन्ना आणि जॉन अब्राहम करणार ऑन स्क्रीन रोमांस; दोघांचे चाहते खूश