Raj Thackeray | ‘त्या’ विधानामुळे कब्रस्तानातील नामफलकावरुन राज ठाकरेंचं नाव खोडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुढीपाडव्यादिवशी (Gudipadva) झालेल्या मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) याचे भाषण आणि त्यातील काही मुद्यांवरुन राज्यभरात मोठे पडसाद उमटत आहेत. गुढीपाडव्यादिवशी केलेल्या भाषणादरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील (Masjid) भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरशांवर (Madrassas) तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर या वक्तव्याने राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेनंतर पुण्यातील (Pune) पदाधिकाऱ्यांनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतर पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS City President Vasant More) यांनीही आपण वॉर्डमध्ये शांतता राखण्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. असं असतानाच आता पुण्यातील कोंढवा (Kondhwa) येथे राज ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या एका कब्रस्तान (Cemetery) मधील शिलेवरील त्यांचं नाव काढून टाकण्यात आले आहे.

 

कोंढवा येथील नुराणी कब्रस्तानमधील (Nurani Cemetery) सुविधांचे लोकार्पण 2013 मध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. परंतु राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लीम समाजामध्ये (Muslim Society) नाराजी पसरली आहे. राज यांनी आपल्या भाषणामध्ये मशिदींबरोबर अजान आणि मुस्लिम समाजाचा अपमान केल्याचा दावा करत काही जनाणी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज ठाकरे यांच्या नावाला काळं फासलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेनंतर निर्माण झालेले प्रश्न आणि टीकेला राज ठाकरे 9 एप्रिल रोजी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये उत्तर देणार
असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title :- Raj Thackeray | muslim erase name of raj thackeray from foundation stone kondhwa pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | रेल्वे कर्मचार्‍यांना ‘या’ महिन्यात मिळेल मोठी रक्कम, 14 लाख लोकांना मिळेल थेट लाभ

 

Sharad Pawar On Maharashtra Home Department | राष्ट्रवादी आपलं गृहखातं शिवसेनेला देणार ?; शरद पवारांनी जरा स्पष्टच सांगितलं…

 

Vaani Kapoor Hot Photo | वाणी कपूरनं फ्लॉन्ट केला बोल्ड अवतार, काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये सोशल मीडियावर केला कहर