Sharad Pawar On Maharashtra Home Department | राष्ट्रवादी आपलं गृहखातं शिवसेनेला देणार ?; शरद पवारांनी जरा स्पष्टच सांगितलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Maharashtra Home Department | काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचं (Central Investigation Agency) धाडसत्र चालू आहे. गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या (Shivsena) संबंधित व्यक्तिंवर कारवाई झालेली पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) जवळील गृहखातं हे शिवसेनेकडे घेण्यात यावं अशी मागणी सेनेच्या नेत्यांनी केली होती. त्यासोबतच एप्रिल महिन्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये (Thackeray Cabinet) बदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अशातच यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar On Maharashtra Home Department)

 

मी यावर बोलू शकत नाही कारण हा तीन पक्षाचा निर्णय असून तिन्ही पक्ष निर्णय याबाबत घेतील. त्यामुळे मला त्याबाबत माहित नाही. मला फक्त एकाच पक्षाचं माहित आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादीत कोणतीही खांदेपालट होणार नाही. राष्ट्रवादीचा कोणताही मंत्री बदलला जाणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

 

महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) कोणताही धोका नसून अडीच वर्षानंतर पुन्हा हेच सरकार सत्तेत येणार आहे.
राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत नव्हती, शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपविरोधात आहेत. कोणाच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नसल्याचं पवार म्हणाले. पंतप्रधान मोदींसोबतच्या (PM Narendra Modi) बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी पवारांनी सांगितलं.

 

दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल नियमाला धरुन काम करत नाहीत.
विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचाही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला आहे.
त्यासोबतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल मोदींना माहिती दिल्याचं पवार म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar On Maharashtra Home Department | NCP will give its home department to Shiv Sena Sharad Pawar made it very clear

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा