बांगलादेशी घुसखोरांबद्दल ‘टीप’ दिल्यास मनसेकडून ‘एवढ्या’ हजाराचं ‘बक्षीस’, माहितीसाठी ‘स्टॉल’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेने वेळोवेळी भूमिका मांडली आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांबद्दलची पक्षाची भूमिका राज ठाकरे यानी आपल्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केली होती. आता या घुसखोरांना देशातून पळवून लावण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. मनसेने बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्याला खास इनामाची घोषणा केली आहे.

घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार अशी घोषणा मनसेकडून करण्यात आली आहे. औरंगाबाद मनसेने ही घोषणा केली केली आहे. घुसखोरांना पकडल्यास 5 हजार रुपये बक्षीस देणार असल्याचे औरंगाबाद मनसेने केली आहे. कोणत्याही परिस्थितीत बांगलादेश आणि पाकिस्तानातील घुसखोरांना पळवून लावण्यासाठी मनसेने चंग बांधला आहे.

मनसेने या मोहिमेला गती देण्यासाठी बक्षीस देण्याची शक्कल लढवली आहे. आकाशवाणी चौकामध्ये मनसेकडून एक स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलवर गुप्तपणे घुसखोरांबाबत माहिती द्यायची आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर घुसखोराची माहिती खरी आहे की खोटी याबाबत पडताळणी करण्यात येणार आहे. दिलेली माहिती खरी निघाल्यास माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्याची खबरदारी मनसेकडून घेण्यात येईल अशी घोषणा औरंगाबाद मनसेने केली आहे.