Raj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा चर्चांचा विषय आहे. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक विधान केले आहे. आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. पोर्तुगीज, मुघल आणि ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरून सध्या राज्यात वाद सुरू आहेत. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटात प्रतापराव गुजर यांच्यासोबत ज्या सहा मावळ्यांची नावे दिली आहेत, ती चुकीची आहेत, असे काहींचे मत आहे. त्यावरून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आला आहे. त्यावरून राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. पोर्तुगीज, मुघल आणि ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या. शिवाजी महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे ‘शिवभारत’ एवढाच काय तो उपलब्ध आहे. त्यात ज्या गोष्टी सापडतात, त्या आपल्यासमोर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रे नाहीत. त्यामुळे यातून काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहोचवावा लागतो. त्यामुळे प्रतापराव गुजरांबरोबर कोण सहा लोक होते, याला काही अर्थ उरलेला नाही.

सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय कोणीही इतिहास दाखवू शकत नाही.
पण त्यावेळी इतिहासाला धक्का लागणार नाही, याची काळजी वाहिली पाहिजे.
जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे महत्वाचे आहे.
पण, सध्या जातीच्या चष्म्यातून इतिहास पाहण्याचे पेव फुटले आहे आणि यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर
आहे. वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या एका कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलो होतो.
त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सहा जणांची नावे टाकली आहेत.
मग कोणीतरी म्हणाले ही सहा नावे नाहीत, तर ही सहा नावे आहेत.
मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतूहल वाटते तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करतो. मी या प्रश्नावर गजानन मेहंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारले. त्यांनी मला कळविले की, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते सात होते, की आठ होते, की दहा होते, हे लिहिलेले नाही. प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते, याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावे ऐकली ती सर्व काल्पनिक नावे आहेत. त्यामुळे मूळ नावे कोणालाही माहीत नाहीत.

Web Title :- Raj Thackeray | raj thackeray comment on maratha and brahmin historian chhatrapati shivaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aditya Thackeray | मंगलप्रभात लोढांच्या विधानाची टीका करणाऱ्यांमध्ये आदित्य ठाकरेंची भर; ट्विटद्वारे म्हणाले, “गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं म्हणजे…”

Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..

Raj Thackeray | ‘आतापर्यंतची आपण ऐकलेली ती सर्व काल्पनिक नावं आहेत’; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबद्दल राज ठाकरेंनी दिलेली माहिती शरद पवारांना मान्य?