अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगीचरणी, या तारखेला होणार विवाह 

ADV
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचे  लग्न येत्या २७ जानेवारीला होणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह फॅशन डिझायनर मिताली बोरुडे यांच्याशी होणार आहे. आपल्याकडे लग्नपत्रिका सर्वात आधी देवाच्या चरणी ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली यांच्या लग्नाची पत्रिका नाशिक येथील सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली.  राज ठाकरे सध्या नाशिक च्या दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या दौऱ्याचा चौथा दिवस आहे.

अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. ११ डिसेंबर २०१७ रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता. आता २७ जानेवारीला ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

रविवार, २७ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या ‘सेंट रेजिस’मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

ADV

कोण आहे मिताली बोरुडे?
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन – डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.