व.पो.नि. राजेंद्र केशवराव मोकाशी यांना महासंचालक सन्मान चिन्हाने गौरविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना महासंचालक सन्मान चिन्ह घोषित. पोलीस दलात केलेल्या गुणवत्तापूर्ण कार्याकरिता त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

मोकाशी हे यापूर्वी कोंढवा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. मोकाशी यांनी अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल केलेली आहे. क्लीष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्याची उकल करून खटले न्यायालयात दाखल केल्याने त्यांना पोलीस महासंचालक चिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे.

संबंधित घडामोडी:
५७१ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक चिन्ह (DG) जाहीर

चिमुकल्यांनी अनुभविली सफर पोलीस स्टेशनची