
Rajeshwari Kharat | राजेश्वरीच्या सोज्वळ आणि सुंदर अदांनी वेधले चाहत्यांचे लक्ष; फोटो वायरल
पोलीसनामा ऑनलाइन टीम : Rajeshwari Kharat | दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘फॅन्ड्री’ मधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात आजही सर्वांच्या लक्षात आहे. फॅन्ड्री या चित्रपटात राजेश्वरीने शालू ही भूमिका साकारली होती. शालू या भूमिकेत तिने तिच्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. सध्या तिचे काही फोटोज वायरल होताना दिसत आहेत. (Rajeshwari Kharat)
राजेश्वरी नेहमीच आपल्या फोटोज आणि व्हिडिओज च्या माध्यमातून तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडत असते. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा लूक चाहत्यांना खूपच भावल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोवर सध्या लाईक आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. या फोटोमध्ये राजेश्वरीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची सलवार सूट परिधान केला असून सिम्पल मेकअप करत केस मोकळे सोडले आहे. तिच्या या सोज्वळ आणि सुंदर फोटोजने चाहते घायाळ झाले आहेत. (Rajeshwari Kharat)
https://www.instagram.com/reel/Cm8eERDBl2S/?utm_source=ig_web_copy_link
आज देखील चाहते शालू आणि जब्याच्या जोडीला विसरू शकले नाहीत. या जोडीला लोकांनी खूपच प्रेम दिले होते. तर नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. या चित्रपटातूनच राजेश्वरी खरातने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. राजेश्वरी अनेकदा तिच्या फोटोवर आलेल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट असे उत्तर देखील देत असते. सोशल मीडियावर राजेश्वरीचे अनेक फॉलोवर्स देखील आहेत. सध्या राजेश्वरीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा काही हटत नाहीयेत.
https://www.instagram.com/p/CnCN9LYJPVE/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Rajeshwari Kharat | rajeshwari kharat shared new look in simple salvar kurti see her photos here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…