राज्यात 16 जुलैपासून दूध संकलन बंद करणार : खासदार राजू शेट्टी 

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन  

केंद्र सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये देण्यात अपयश आले असून त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात 16 जुलैपासून दूध उत्पादक शेतकरी बेमुदत दूध संकलन बंद करणार आहे. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40cdd661-7eb2-11e8-b55b-5fec62a7eabd’]

यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, दूध उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागील आठवड्यात पुण्यातील साखर संकुलावर भव्य मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाची सरकारकडून दखल घेतली गेली नाही. ही निषेधार्थ बाब असून या पार्श्वभूमीवर येत्या 16 जुलैपासून दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन करणार नाही.जे दूध संकलन केले जाईल.ते नागरिकांना मोफत वाटले जाईल.जो वर प्रति लिटर 5 रुपये शेतकयांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.तो पर्यँत संप मागे घेणार नाही.अशी भूमिका त्यांनी मांडली.

ते पुढे म्हणाले की, दूध संकलन बंद च्या काळात महाराष्ट्रात इतर राज्याचे दूध येणार नाही. याची काळजी घेऊ यासाठी राज्याचे प्रत्येक प्रवेशद्वारावर संघटनेचे कार्यकर्ते असतील.असे त्यांनी सांगितले.