Rajvardhan Hangargekar | अंडर 19 विश्वकप खेळताना महाराष्ट्राच्या ‘या’ खेळाडूने लपवली मोठी गोष्ट?

पोलीसनामा ऑनलाइम टीम – भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषक (Under-19 Cricket World Cup) आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यात इंग्लंड संघाचा पराभव करत भारतीय संघाने पाचव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मात्र भारतीय संघातील (Indian Team) अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगर्गेकरवर (Rajvardhan Hangargekar) वय फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राजवर्धनवर (Rajvardhan Hangargekar) आरोप केला आहे.

 

राजवर्धन हंगर्गेकरवर (Rajvardhan Hangargekar) खेळाडूने वय लवपल्याचा त्यांचा आरोप असून याबाबत ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी वय लपवल्याचे काही पुरावेही दिले आहेत. राजवर्धन हा उस्माणाबादमधील तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. या शाळेतील रेकॉर्डनुसार राजवर्धन याची पहिली ते सातवीपर्यंतची जन्मतारीख (Date Of Birth) ही 10 जानेवारी 2001 होती. मात्र आठवीमध्ये गेल्यावर त्यांच्या मुख्याध्यापकांनी ही तारीख 10 नोव्हेंबर 2002 केली. त्यामुळे विश्वचषकावेळी त्याचं वय हे 21 इतकं होतं.

राजवर्धनने विश्वचषकामध्ये चांगलं प्रदर्श केलं. यामध्ये त्याने युगांडा (Uganda) या संघाविरोधात खेळताना सर्वोत्तम कामगिरी केली होती. 8 धावा देत त्याने दोन गडी बाद केले. त्यासोबतच आर्यंलँडविरूद्धच्या (Ireland) सामन्यात राजवर्धनने 17 चेंडूत 39 धावांची आक्रमक खेळी केली होती. ओमप्रकाश बकोरिया यांनी यांनी दिलेल्या तक्रारीमुळे राजवर्धन समोरील अडचणीत वाढ झाली आहे.

 

दरम्यान, आयपीएलची (IPL) लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये अंडर 19 विश्वकप संघातील खेळाडूही होते.
यामध्ये राजवर्धनचाही समावेश होता. राजवर्धनला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने 1.5 कोटींना विकत घेतले होते.
बीसीसीआय काय पाऊलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Rajvardhan Hangargekar | cricket under 19 world cup player rajvardhan hangargekar age fraud controversy chennai super kings

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 334 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

 

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ठरतेय ‘घुमजाव पार्टी’

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पंचायत समितीमधली महिला कनिष्ठ सहायक 500 रुपये लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Malaika Arora Bold Hot Photos |’अरे खाली काहीतरी घालायचं होतंस…’, मलायका अरोराच्या ‘हा’ ड्रेस पाहून सोशल मीडियावर भडकले लोक