हर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull ! दिवसाची कमाई तब्बल 5.6 कोटी

पोलिसनामा ऑनलाइन – शेअर बाजारातील (Share Market) सर्वात यशस्वी गुंतवणूकदार अशी राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची ओळख आहे. हर्षद मेहता (Harshad Mehta) यानं शेअर मार्केटमधून रग्गड कमाई करण्याच स्वप्न पाहिलं आणि काही प्रमाणात ते यशस्वी देखील झालं. परंतु घोटाळा उघडकीस आला आणि हर्षद मेहता तुरूगांत गेला. परंतु राकेश झुनझुनवाला मात्र शेअर बाजारातील बिग बुल ठरले आहेत. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे म्हटलं जातं. फोर्ब्सच्या (Forbes) सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांचा 54 वा क्रमांक आहे. कोरोनामुळं संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. देशांच्या अर्थव्यवस्था रुळावरून घसरल्या आहेत. कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले. मात्र याच कालावधीत झुनझुनवाला यांनी 1400 कटी रुपये कमावले.

राकेश यांचे वडिल हे आयकर अधिकारी होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात राकेश झुनझुनवाला यांचा जन्म झाला. महाविद्यालयात असतानाच त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 150 च्या आसपास असताना त्यांनी गुंतवणुकीत लक्ष घातलं. आजच्या घडीला हाच निर्देशांक 40 हजारांच्या घरात आहे. यावरून राकेश यांच्याकडे किती मोठा अनुभव आहे याचा अंदाज सहज लावता येईल.

1968 ते 1989 या काळात राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीवरून 20 ते 25 लाखांची कमाई केली. तेव्हापर्यंत इतकी कमाई कोणालाही जमलेली नव्हती. हर्षद मेहता प्रकरण उजेडात आल्यानंतर राकेश झुनझुनवाला यांनी राधाकृष्ण दमानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड कमाई केली. हर्षद मेहताच्या अटकेमुळं शेअर बाजारात एक मोठी आर्थिक पोकळी निर्माण झाली होती. ती राकेश झुनझुनवाला यांनी भरून काढली.

गेल्या काही वर्षांपासून राकेश झुनझुनवाला यांना टायटन, क्रिसिल, सेसा गोवा, प्राज इंडस्ट्रीज, ऑरिबिंदो फार्मा, एनसीसीमध्ये गुंतवणूक केली आणि देशातले सर्वात श्रीमंत गुंतवणूक ठरले. रेअर एंटरप्रायजेस नावाची स्टॉक ट्रेडींग फर्म चालवणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी 2017 मध्ये एकाच सेशनमध्ये तब्बल 875 कोटी रुपयांची कमाई केली होती. हर्षद मेहता प्रकरणात सेबीनं कारवाई केली. त्यावेळी राकेश झुनझुनवाला हे देखील सेबीच्या स्कॅनरखाली होते असं बोललं जातं.

23 मार्चपासून राकेश झुनझुनवाला यांनी इस्कॉर्टस नावाच्या एका कंपनीच्या माध्यमातून दर दिवसाला सरासरी तब्बल 5.56 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त बिजनेस टु़डेनं (Business Today) दिलं आहे. शेअर्स किंमत कमी असताना ते विकत घ्यायचे. कमी कालावधीसाठी नुकसान होत असलं तरी भविष्यातील फायदा पहायचा. दीर्घकालीन विचार करायचा, हे राकेश झुनझुनवाला यांचं तत्व आहे. त्यामुळंच राकेश झुनझुनवाला काय करतात हे पाहून शेअर विकायचे की, खरेदी करायचे याचा निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे.