Rakhi Sawant | बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला अटक; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेत्री डान्सर राखी सावंत (Rakhi Sawant) अनेक दिवसांपासून चर्चेत होती. सुरुवातीला तिच्या लग्नावरून अनेक वाद-विवाद निर्माण झाले होते. तर त्यानंतर ती गरोदर असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले होते. तर आता चक्क राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती अभिनेत्री शरलीन चोप्राने ट्विट करत दिली आहे.

 

राखी सावंतने काही मॉडेलचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तिला अटक केली आहे. शरलीन चोप्रानी केलेल्या ट्विटमध्ये तिने म्हटले की, “आंबोली पोलिसांनी राखी सावंत ला 833/ 2002 क्रमांकाच्या एफआयआर प्रकरणी अटक केली आहे. यासाठी राखीने अटकपूर्व जामीनाची मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे”.

 

राखी सावंत विरोधात तक्रार शरलीन चोप्रानेच केल्याचे सांगितले जात आहे. शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ राखीने पत्रकार परिषदेत दाखवत आक्षेपार्ह भाषेत विधान केल्याने तिने रखीविरुध तक्रार दाखल केली होती.
आज राखी तिचा पती आदिल खान बरोबर भागीदारीमध्ये सुरू केलेल्या डान्स अकॅडमीचे उद्घाटन करणार होती.
मात्र आता तिच्या या अटकेमुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा