Satyajit Tambe | डॉ. सुधीर तांबेंपाठोपाठ सत्यजीत तांबेंची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुधीर तांबे (Dr.Sudhir Tambe) यांना काँग्रेस (Congress) पक्षाने एबी फॉर्म देवून देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न करत नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाविरूध्द बंडखोरी केली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे निलंबण करण्यात आले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत होता. त्यावर आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यावर निलंबणाची कारवाई करत असल्याचे जाहीर केले आहे.

आता काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सत्यजीत तांबे यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे देखील बोलले जात आहे. आज (दि. १९) माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता भाजपकडून अधिकृतपणे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला जाणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्या नंतर आता तांबे पिता-पुत्रांना भाजपकडे पाठिंबा मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज आयोजीत करण्यात आलेल्या संयुक्तिक पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने राज्यातील पदवीधर व
शिक्षक मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केली. त्यानुसार, नागपूर- सुधाकर अडबेले,
अमरावती- धीरज लिंगाडे, औरंगाबाद- विक्रम काळे, नाशिक- शुभांगी पाटील आणि कोकण- बाळाराम पाटील
हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

नाशिक पदवीधर मतदार संघात बंडखोरी केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
मात्र सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) हे आमदार किंवा खासदार नसल्याने त्यांच्याविरूध्द प्रदेशस्तरावरच कारवाई करण्यात येणार होती. त्यानुसार आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची घोषणा केली.

त्यानंतर आता तांबे पिता-पुत्र कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तांबे यांनी बोलताना आपली भूमिका १९ अथवा २० जानेवारीला जाहीर करू असे म्हटले होते.
तर भाजपनेही आपला अधिकृत उमेदवार या मतदारसंघात दिलेला नाही.
त्यामुळे तांबे पिता-पुत्र आणि भाजप हे काँग्रेसच्याच निर्णयाची वाट पाहत होते का?
असा सवाल उपस्थित होत असून आता भाजप आणि तांबे एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे विरूध्द शुभांगी पाटील असा सामना पहायला मिळणार आहे.
त्यामुळे यात विजयश्री कोण संपादित करतो याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Satyajit Tambe | satyajeet tambe suspended from congress party due to rebellion from nashik graduate constituency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…