Video : राखी सावंतने भीक मागणाऱ्या मुलांना दिली मोठी शिकवण, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइनः बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. त्यासाठी ती सतत काहीना काही करत असते. तसेच ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते. तिने पोस्ट केलेले सर्वच व्हिडिओ नेहमीच चर्चेत येतात. यावेळी राखीचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. यात तिने हलक्या फुलक्या अंदाजात मोठी शिकवण दिली आहे. राखीचा हा व्हिडीओ पाहून लोक खूप कौतूक करत आहेत.

 

 

 

 

राखीने काही लहान मुलासोबत रस्त्यावर दिसून येत आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना राखी सावंतने नारळ पाणी पाजले आणि फळ खाऊ घातले. तसेच राखीने या मुलांना खूप प्रेमाने काही गोष्टी समजावून सांगितल्या. तिने या मुलांना शाळेत जाण्याचा सल्ला दिला. राखी म्हणाली की, शाळेत जा, काम करा पण भीक मागू नका. भीक मागणे चांगली गोष्ट नाही, ही चुकीचे काम आहे. जेव्हा राखी या मुलांना भीक मागण्यासाठी मनाई केल्यावर मुले सांगू लागले की घरी छोटे छोटे भाऊ आहेत, त्यांच्या खाण्यासाठी भीक मागावे लागते. त्यावर पुन्हा राखीने पुन्हा त्यांना समजावले की, तुमच्या आईला सांगा की बाळांना जन्म देऊ नको. रस्त्यावर भीक मागणे चुकीचे आहे. राखीचा हा व्हिडीओ समोर येताच खूप व्हायरल झाला आहे. लोक राखीचे खूप कौतूक करत आहेत. कुणी राखीला मोठ्या मनाची म्हणत आहे तर कोणी राखीचा सल्ला फॉलो करायला सांगत आहे.