खा. रक्षा खडसेंकडून ‘त्या’ हसण्याचं स्पष्टीकरण ; म्हणाल्या, आम्ही..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल म्हणजे शुक्रवारी संसंदेत खासदार डॉ. भारती पवार शेतकरी कर्ज माफी केल्याबद्दल आभार व्यक्त करत होत्या. तेव्हा त्यांच्या मागे बसलेल्या खासदार प्रितम मुंडे आणि खासदार रक्षा खडसे या हसतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओवरून प्रितम मुंडे आणि रक्ष खडसे यांच्यावर अनेकांनी टीका केल्या तर अनेकांनी त्यांना सपोर्ट करत त्यात काही चुकीचे नाही असं म्हटलं. तसंच त्या दोघी नेमके का आणि कशावर हसल्या, असे सवाल करण्यात आले. त्यावर आता रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी आणि प्रितम मुंडे सहज हसलो होतो. असं म्हणत राष्ट्रवादी या गोष्टीचे भांडवल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी लगावला आहे.

मी आणि प्रितम मुंडे आम्ही सहज हसलो होतो. त्याच्या भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आम्ही चर्चा करत असतो. त्याकडे लक्ष दिले जात नाही. पण आम्ही हसलो म्हणून हा विषय अधिक गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या व्हीडिओचे भांडवल करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

संसदेत महाराष्ट्राचे खासदार बोलत असल्यास त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थाबंतो, त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. खासदार भारती पवार भाषण करीत असल्यामुळे त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यांचे भाषण सुरू असतांना अगदी शेवटच्या क्षणी आम्ही सहजच हसलो, आणि संसदेत थोडेफार हसणे सुरूच असते, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी माध्यमांना चुकीते वृत्त पसरवू नका अशी विनंतीही केली. चांगल्या कामाची प्रसिध्दी करावी. त्या मुंडेच्या कन्या आहेत आणि मी खडसेंची सून आहे म्हणून त्यांनी हास्य केले असे म्हणणे म्हणण योग्य नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त