रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण : एकनाथ पवार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय संस्कृती हि पवित्र दृष्टीने आणि आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी आहे. रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण असल्याचे मत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

बहीण भावाच्या स्नेहबंधनाचे पवित्र नाते जपणारा रक्षबांधन सगळीकडे साजरा होतो आहे. याच रक्षाबंधनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता महिला कर्मचारी यांनी रक्षाबंधनाचा सन साजरा केला. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना स्वच्छता महिला कर्मचा-यांनी राखी बांधून दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो म्हणून प्रार्थना करण्यात आली.

दीपक मानकर यांना कारागृहात मिळणार घरचे जेवण आणि औषधे

पूर्णानगर येथील पक्षनेते पवार यांच्या संपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी भाजपा महिला शहर उपाध्यक्ष अश्विनी शिंदे, योगिता केदारी, वैशाली खामकर, सोनू भालेराव, विजय घोडके , निलेश सुंभे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a25f743b-a9fb-11e8-885a-89b096f5023b’]
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले कि, रक्षाबंधनाला केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. समाजात केवळ स्त्रियांचे भाऊ म्हणून रक्षण करणे पुरेसे नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या घडीला समाजात स्त्री-पुरुष समानता मानणे, स्त्रीचा आदर करणे तसेच सर्वाना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.