कसा संपला प्रभू श्रीराम यांचा अवतार ? माता सीता पृथ्वीमध्ये समर्पित झाल्यानंतर कसे होते त्यांचे आयुष्य ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : भगवान श्रीराम यांच्या संदर्भातील अनेक कथा लोकांना माहित आहे. श्रीरामांनी आपली मुल लव्ह-कुश आणि पत्नी सीता यांची ऋषी वाल्मीकि यांच्या आश्रमात घेतलेली भेट, अग्नी परीक्षेनंतर सीतेने आपले जीवनाचा केलेला त्याग, रामा आपल्या मुलांबरोबर अयोध्येत परत आल्यावर राजवाड्यात त्यांच्यासाठी नवीन घर बांधले. परंतु सीता माता पृथ्वीत समर्पित झाल्यांनतर रामाच्या उर्वरित आयुष्याचे काय झाले हे फार थोड्यांना माहिती आहे. भगवान राम यांचे आयुष्य कसे संपले ते वाल्मिकीच्या रामायणातून नव्हे तर पद्म पुराणात आहे. सीतेला गमविल्यानंतर श्री रामाने अनेक वर्षे अयोध्येत राज्य केले. त्यांनी आपल्या मुलांना राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी तयार केले.

एक परिपूर्ण राजा
आपल्या कारकिर्दीत रामाने अयोध्या मधील लोकांसाठी अनेक यज्ञ केले. अयोध्यातील लोक रामाला अयोध्याचा सर्वश्रेष्ठ आणि आदर्श राजा मानत होते. रामाचे आयुष्य असेच सुरु असताना, एके दिवशी एक ज्ञानी ऋषी श्रीराम यांना भेटायला येतात आणि एकांतात भगवान राम यांच्यासह काही महत्वाचे चर्चा करण्याबाबत परवानगी मागतात. भगवान राम ऋषींचे बोलणे ऐकण्यासाठी नम्रपणे जमिनीवर बसण्यास सांगतात. ऋषींच्या सल्ल्यानुसार रामाने आपला भाऊ लक्ष्मण यांना सांगितले की आपण दारातच रहावे आणि या महत्त्वपूर्ण संभाषणादरम्यान कोणालाही आत येऊ देऊ नये.

दरम्यान, भगवान रामाला भेटायला आलेले ऋषी दुसरे कोणी नाही तर काल देव होते. काल देव श्री रामाला याची आठवण करून देण्यासाठी आले की पृथ्वीवरील त्यांचा ‘वेळ’ आता संपला आहे आणि आता त्यांनी मूळ निवासस्थान वैकुंठात परत यावे. राम आणि काल देव यांच्यातील गुप्त संभाषणादरम्यान महर्षि दुर्वासाचे आगमन होते. महर्षि दुर्वासा आपल्या चंचल स्वभावासाठी परिचित होते. महर्षि दुर्वासाने रामला त्वरित भेटण्यास परवानगी मागितली. लक्ष्मण महर्षि दुर्वासाला परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु महर्षि दुर्वासा ऐकायला तयार नसतात, यांना लक्ष्मणचा राग येतो आणि असेही म्हणतात की, जर त्यांना आत जाऊ दिले नाही तर ते लक्ष्मणला शाप देतील. लक्ष्मणला समजत नाही की, त्याने भावाच्या आदेशाचे उल्लंघन करावे कि शाप सहन करावा ?

लक्ष्मणला समजले की, ही सर्व परिस्थिती त्यांना शेवटचा मार्ग दाखविण्यासाठी एक संकेत होता. ते शरयू नदीत प्रवेश करतात आणि अनंत शेष रूप धारण करतात. दुसरीकडे राम विष्णूचा राम अवतार संपवण्याची तयारी करीत असतात, तेव्हाच त्यांना लक्ष्मणबद्दल समजते. तेसुद्धा शरयू नदीत अदृश्य देवतांसोबत चालत जातात आणि अशा प्रकारे त्याचा राम अवतार संपतो.

राम पुन्हा देवता बनतात
शरयूमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच महाविष्णू त्याच्या मूळ रूपात दिसतात, त्याच ठिकाणी लोक आधीच एकत्र आले होते. त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला. राम विष्णू आणि लक्ष्मण आदिशेष झाले. जरी बहुतेकांचा असा विश्वास आहे की रामचा अंत असा होता, तरीही काही लोकांचे मत वेगळे आहे. पुराणात असे नमूद केले आहे की, विश्वाचे पालनहार भगवान विष्णू आपले अस्तित्व संपवू शकत नाहीत. विश्वाचे विनाशक म्हणून हे काम फक्त शिवच करु शकतात.

वराह अवतार
तार्किक दृष्टीकोनातून समजून घेतल्यास रामाचा अंतही विष्णूच्या पहिल्या अवतारांसारखा होता. कालिका पुराणात सांगितल्याप्रमाणे, आपली कर्तव्ये पार पाडल्यानंतर, विष्णूचा वराह अवतार कौटुंबिक संबंधांच्या मोहमायात अडकला. अशावेळी वराहाने स्वत: चा जीव संपवला नाही, त्याऐवजी देवता भगवान शिव यांची मदत घेण्यासाठी कैलासकडे वळले. देवदेवतांनी विनवणी केल्यावर शिव पक्षी आणि प्राण्यांचा बनलेला एक शरभ अवतार घेतात, जे वराहशी लढाई करून विष्णूला मुक्त करतात. तशाच प्रकारे भगवान शिवच्या शरभ अवताराने नरसिंह अवतार नष्ट झाला होता.

रामाने आपल्या इच्छेविरूद्ध देहाचा बळी कसा दिला?
भगवान राम हे स्वेच्छेने आपले अस्तित्व सोडून देणारे पहिला अवतार होते, कारण त्यांनी आदर्श मनुष्याचे (पुरुषोत्तम) आयुष्य जगले. त्यांना लोकांसमोर धर्माचे एक उदाहरण ठेवायचे होते. एखाद्या रहस्यमय प्राण्याच्या हाताने हिंसक मृत्यू त्याच्या अवतारांसाठी योग्य नव्हता. म्हणून त्यांनी नदीत सामील होऊन हा अवतार संपवला.