Ramdas Athawale In Pune | …म्हणून मलाही पुण्यात राहायला यावेसे वाटतेय – रामदास आठवले

महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत 'हर्बल गार्डन'चे लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Athawale In Pune | “चांगल्या आरोग्यासाठी हर्बल गार्डन (Herbal Garden) अतिशय उपयुक्त आहे. येथील औषधी वनस्पती, त्याचा येणारा सुवास, त्यामुळे मुलांना उद्यानात खेळताना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. ‘भाजप-रिपाइं’ युतीमुळे (BJP RPI Alliance) पुण्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे (Pune Development Plan) होत आहेत. या विकासकामांसह हर्बल गार्डन, उद्याने यामुळे पुणे राहण्यासाठी अधिक चांगले बनत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale In Pune) यांनी केले. पुण्याचा विकास पाहून मलाही मुंबई (Mumbai) सोडून पुण्यात राहण्यास यावेसे वाटतेय, असे आठवले यांनी मिश्कीलपणे सांगितले.

 

माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे (Corporator Dr. Siddharth Dhende) यांच्या संकल्पना व विकास निधीतून उभारलेल्या ‘वीरचक्र सन्मानित कर्नल सदानंद साळुंके हर्बल गार्डन’चे (Colonel Sadanand Salunke Herbal Garden) लोकार्पण रामदास आठवले (Ramdas Athawale In Pune) यांच्या हस्ते झाले. प्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar), भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP Jagdish Mulik), ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण (RPI Shailendra Chavan), कर्नल (नि.) सदानंद साळुंके, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव (RPI Balasaheb Janrao), पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar), अल्पसंख्याक आघाडीचे अ‍ॅड. आयुब शेख (Adv. Ayub Shsikh), स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक (Yogesh Mulik), स्थानिक नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी (Corporator Bapurao Karne Guruji), फरझाना शेख (Farzana Shaikh), माजी नगरसेवक अशोक कांबळे (Former Corporator Ashok Kamble), मंगेश गोळे (Mangesh Gole) आदी उपस्थित होते.

 

रामदास आठवले म्हणाले, “१९७१ च्या युद्धात योगदान दिलेल्या कर्नल सदानंद साळुंके यांच्या नावाने हे औषधी उद्यान झाले, याचा आनंद आहे.
या उद्यानातून आरोग्याला पूरक गोष्टी, तसेच मुलांना औषधी वनस्पतींविषयीचे ज्ञान मिळेल. गेल्या पाच वर्षात पुण्यात विकासकामांची मालिका सुरु आहे.
रस्ते, पाणी, उद्याने, वाहतूक व्यवस्था, मेट्रो, उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत.
डॉ. धेंडे यांनी आपल्या भागातील इतर नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम केले आहे. येत्या निवडणुकांत भाजप-रिपाइं युतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.”

 

जगदीश मुळीक म्हणाले, “या औषधी उद्यानाचा या भागातील नागरिकांना लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने हे उद्यान अतिशय उपयुक्त आहे.
‘स्वप्नपूर्ती’ करण्याचे काम भाजप-रिपाइं युतीने केले. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासह इतर उपक्रमांचे लोकार्पण व अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले,
याचा अभिमान वाटतो. गेल्या ५० वर्षात जितकी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक पटींनी पाच वर्षात विकासाची कामे झाली.
विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात दंग असून, प्रशासक बसवून निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव आखत असले,
तरी महापालिकेत भाजप-रिपाइंचीच सत्ता येणार आहे.”

 

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्वागत प्रास्ताविकात उद्यानाची उभारणी, त्याचे महत्व याविषयी माहिती दिली.
कर्नल सदानंद साळुंके यांनी आपल्या नावाने उद्यान उभारल्याबद्दल डॉ. धेंडे, महापालिका व स्थानिक नागरिकांचे आभार मानले.
सुनीता वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, कर्णे गुरुजी यांनीही मनोगते व्यक्त केली. ऍड. आयुब शेख यांनी आभार मानले.

 

 

Web Title :- Ramdas Athawale In Pune | … so I want to live in Pune too – Ramdas Athawale -Herbal Garden in Maharashtra Housing Society

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gajanan Marne | कुख्यात गजानन मारणेची जेलमधून वर्षभरानंतर सुटका; जाणून घ्या प्रकरण

 

Narayan Rane | ‘त्या’ प्रकरणात नारायण राणे, नितेश राणेंची 9 तास चौकशी

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 99 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी