Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 99 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona Update) दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहयाल मिळत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 99 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 129 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 703 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 99 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 032 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 019 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 665 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 57 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 5 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 6 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 38.19 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 99 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BCCI Announces Schedule For TATA IPL 2022 | आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई, चेन्नई वेगवेगळ्या गटात, पाहा कोणता संघ कोणत्या गटात; वाचा सविस्तर

 

BCCI Announces Schedule For TATA IPL 2022 | आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई, चेन्नई वेगवेगळ्या गटात, पाहा कोणता संघ कोणत्या गटात; वाचा सविस्तर

 

Pune Crime | पुणे पोलिसांना गुंगारा देणार्‍या गुंडाला कोल्हापूरात अटक; क्रिकेटच्या सामन्यात वेशांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला पोलिसांनी केले जेरबंद