आठवले म्हणतात, ”प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी है बहुतही चालाख…”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी महाराष्ट्रातच नाहीतर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. रामदास आठवलेंचे असे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचा संसदेतील असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या कवितांनी संसदेतील वातावरण एकदम हलके झाल्याचं या व्हीडिओत दिसत आहे.

सोशल मीडियावरील त्यांचा हा व्हीडिओ सध्या चांगला गाजत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला प्रत्येक मंत्री आपल्या भाषणातून प्रतिसाद देत होते. एकामागोमाग एक भाषणे होत असल्यामुळे सभागृहातले खासदार कंटाळले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. अनेक खासदार पेंगुळले होते.

यावेळी आठवले यांनी उठून आपल्या कवितेच्या भाषेत, राहुल को लग गयी है चाहूल; २०१९ का मोदीजी ने बनाया है माहूल, असं म्हणत संसदेतील वातावरण मजेशीर केले. तसंच नरेंद्र मोदीजी का था अच्छा लक्षण, इसलिऐ मिल रहा है सवर्णोंको आरक्षण, अशा अनेक कविता त्यांनी यावेळी म्हणून दाखवल्या.

दरम्यान, या व्हीडिओमध्ये आठवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांच्या या व्हीडिओवर अनेकांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत.