Ramdas Kadam | शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल करणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी एकनाथ शिंदे गटात (Shinde Group) सामील होण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) पुन्हा कामाला लागले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे कौतुक करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असा थेट सवाल कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

 

आधीच्या मुख्यमंत्र्यांची गिनीज बुक मध्ये नोंद

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, एकनाथ शिंदे चांगले निर्णय घेत आहेत, दिवसरात्र काम करत आहेत. मंत्रालयात काम करतात, नंदनवनमध्ये लोकांना भेटत आहे. या आधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात तीन वेळा मंत्रालयात आले होते. गिनीज बुकात याची नोंद झाली, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

 

सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर बसलात

सत्तेसाठी शरद पवारांच्या (Sharad Pawar) मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांची आठवण झाली का, असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे.
तसेच राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत.
आता जाणीव झाल्यानंतर सगळ्या शिवसेना नेत्यांच्या गाठीभेठी सुरु झाल्या आहेत.
मग सत्तेत असताना गेली अडीच वर्षात काय झाले होते, असा सवालही त्यांनी केला आहे.

 

महाराष्ट्र दौरा करणार

उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणही राज्याचा दौरा करणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहीर केलं.
नेमकं काय घडलं, ही वस्तुस्थिती राज्यातील जनतेला सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title : –  Ramdas Kadam | dont you remember when shiv sena chief sat on pawars lap ramdas kadams direct challenge to uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा