Ramdas Kadam | उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा, म्हणाले-‘… तर मानहानीचा दावा ठोकणार’

खेड/रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पहिलीच सभा होत आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. या सभेआधी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाला इशार दिला आहे. माझ्यावर काहीही आरोप केले तर मानहानीचा दावा ठोकेन, असे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

रामदास कदम बंगाली बाबा

उद्धव ठाकरे यांच्या खेड येथील सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (NCP Former MLA Sanjay Kadam) हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी संजय कदम यांनी सकाळी रामदास कदम आणि त्यांचे आमदार पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर निशाणा साधला. रामदास कदम (Ramdas Kadam) हे बंगाली बाबा आहेत. ते पर्यावरण मंत्री असताना मिळालेल्या पैशातून मुलाला आमदार केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला. या आरोपानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

संजय कदम गावठी आमदार

संजय कदम यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना रामदास कदम म्हणाले, मला वाटतं की, त्यांचा अजिबात अभ्यास नाही. गावठी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पाच वर्षात ते विधिमंडळात कितीवेळा बोलले, याची माहिती काढा, म्हणजे कळेल. मुळात पर्यावरण खात्याला आर्थिक निधीची कोणतीही तरतूद नव्हती. तसेच हे खातंही अस्तित्वात नव्हते.

पर्यावरण खाते हे वेगळं कधीच नव्हतं. वन आणि पर्य़ावरण विभाग असं हे खातं होतं. ते तोडून बाजूला केलं. मला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून उद्धव ठाकरेंनी मला हे खातं दिलं. त्याला शून्य बजेट होतं. मात्र तलावाच्या सुशोभीकरणासाठी मुनगंटीवार यांना सांगून मी निधी घेतला आणि तलावाची कामं केली, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.

उद्धव ठाकरेंना व्याजासकट उत्तर देणार

रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला 30 हजाराहून अधिक लोक येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना त्याच मैदानावरुन जशास तसं उत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या 19 मार्चला जाहीर सभा घेऊन व्याजासह सर्व उत्तर दिली जातील, असे कदम यांनी सांगितले.

बाहेरची लोकं आणून राजकारण होत नसतं

ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातून लोक आणण्याची तयारी सुरु आहे.
जणू काही खेडला दसऱ्याची जाहीर सभाच आहे अशी तयारी सुरु आहे.
बाहेरची लोकं आणून इथे राजकारण होत नसतं, असा टोला कदम यांनी ठाकरे गटाला लगावला.
तसेच या सभेला स्थानिक किती असणार? दोन चार टक्के तरी आहे का?
म्हणून त्याची काळजी नसल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

Web Title :-  Ramdas Kadam | ramdas kadam reaction over sanjay kadam allegations yogesh kadam mla uddhav thackeray rally in khed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hemant Rasane | रवीभाऊ, देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा, हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

Aurangabad Accident News | अपघाताचे फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; 53 वर्षीय व्यक्तीला विनाकारण गमवावा लागला जीव

MPSC Recruitment | MPSC कडून तब्बल 673 जागांवर होणार भरती; सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी