१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! आता १२ वी नंतर करू ‘B.Ed.’ शकता, सरकारनं याच सत्रापासून दिली ‘मान्यता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने चार वर्षीय एकीकृत बीएड पाठ्यक्रम सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. यानुसार आता या शैक्षणिक वर्षापासून कॉलेजमध्ये पाठ्यक्रम सुरु करु शकतात. यासंबंधित माहिती देताना मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बृहस्पतिवार यांना राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नला उत्तर दिले.

त्यांनी सांगितले की, अध्यापक बनण्यासाठी इच्छुक युवकांना बारावी परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर लगेचच चार वर्षीय बीएड अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यांनी सांगिेतले की बीए बीएड, बीकॉम बीएड आणि बीएससी बीएड अभ्यासक्रमासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षण संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या संस्था अर्ज करतील त्या संस्था या वर्षापासून अभ्यासक्रम सुरु करु शकतील. आता अर्ज करणाऱ्या संस्था ४ वर्षींय बीएडला प्रवेश देऊ शकतात आणि कोर्स सुरु करु शकतात.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदने २० नोव्हेंबरला या संबंधात अधिसूचना जारी केली होती. याअंतर्गत आता ४ वर्षीय अभ्यासक्रम सुरु होणार असे सांगितले होते. यात प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराला ठरवावे लागले की, त्याला प्रार्थमिक शाळेचा शिक्षक बनयचे आहे की, उच्च प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचा शिक्षक बनवायचे आहे. पर्याय निवडीनंतर त्यांना चार वर्षांपर्यंत डिग्री अभ्यासक्रम असणार आहे.