#VideoViral : फेवरेट अ‍ॅक्टरला भेटायला गेलेला चाहता बसला फरशीवरच, अ‍ॅक्टर झाला ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार्स नेहमीच आपल्या चाहत्यांना जी वागणूक देतात त्याची नेहमीच चर्चा होतााना दिसते. नुकताच आता अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या फॅनच्या खास मिटींगचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे रणबीरवर खूप टीका होताना दिसत आहे. रणबीर ट्रोल होताना दिसत आहे.

तुम्ही व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एक फॅन रणबीरला भेटण्यासाठी येतो. जेव्हा रणबीर कपूर येतो तेव्हा तो फॅन त्याच्या पाया पडतो. फॅनचं हे वागणं पाहून रणबीर खूप काम दिसत आहे. त्याने लगेच त्याच्यासोबत बोलायला सुरुवातही केली. त्या फॅनने रणबीरला एक गिफ्टही दिलं. त्यानंतर त्याने रणबीरला ते गिफ्ट खोलायला सांगितले. यादरम्यान रणबीर कपूर एका सोफ्यावर बसतो परंतु त्याचा हा चाहता त्याच्या शेजारी फरशीवरच बसतो.

हा व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. शिवाय रणबीर कपूक चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, चाहत्याला भेटलेल्या रणबीरचं वागणं अजिबातच बरोबर नाही. कारण त्याने त्याच्या चाहत्याला पाया पडण्यापासूनही अडवलं नाही आणि शिवाय तो चाहता फरशीवर बसताना त्याला आपल्या शेजारी किंवा सोफ्यावर बसायलाही सांगितले नाही.

रणबीर कपूरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्याने स्वत: पुढे येऊन स्पष्टीकरणही दिले आहे. चाहत्याचं अजून एक व्हिडीओ समोर आलं आहे ज्यात तो चाहता सांगतो की, “सोशलवर रणबीर कपूर गर्विष्ट असण्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्या चुकीच्या आहेत. तो मनाने चांगला माणूस आहे. शिवाय मी जमिनीवर यासाठी बसलो होतो कारण मी त्याला फोटो अल्बम दाखवत होतो. तोच फोटो अल्बम जो मी त्याला गिफ्ट दिला होता. रणबीरने मला या अल्बमवर त्याचा ऑटोग्राफ तर दिलाच सोबत मला त्याची कॅपही गिफ्ट म्हणून दिली.”

आरोग्य विषयक वृत्त –

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

Loading...
You might also like