रंगपंचमीवर देखील कोरोनाचे सावट ! जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळं रंगाच्या या उत्सवावर विरजन पडले आहे. यंदा रंगपंचमीवर कोरोनाचे सावट आहे. परिणामी, ही रंगांची रंगपंचमी बेरंग झाली आहे. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. महाराष्ट्रात खासकरुन रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीचा उत्सव खेळण्याची परंपरा खूप जुनी आहे, होळीपेक्षा रंगपंचमी खूप उत्साहात साजरी केली जाते. होळीच्या पाच दिवसांनंतर रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या सणाला देवपंचमी असं देखील म्हटलं जातं. कारण सगळे देव या दिवशी रंगोत्सव साजरा करायचे अशी अख्यायिका आहे. हा सात्विकच्या पूजेचा दिवस आहे. रंगपंचमी धनदायक मानली जाते.

कथांमध्ये असे सांगितलं जातं की, रंगपंचमीवर पवित्र मनाची उपासना केल्यावर देवी-देवता स्वत: भक्तांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देण्यासाठी येतात. विविध रंगामुळे वाईट गुणांचा नाश होतो. यंदा आज चैत्र महिना कृष्ण शुक्रवार २ एप्रिल २०२१ रोजी रंगपंचमी साजरी केली जात आहे.

जाणून घ्या रंगपंचमीचा मुहूर्त
शुक्रवार, २ एप्रिल २०२१ रोजी
तिथि प्रारंभ – १०:५९ (सकाळी) १ एप्रिल २०२१
तिथि समाप्त – ०८:१५ (सकाळी) २ एप्रिल २०२१