Ranveer Singh | रणवीरने केले ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे शेवटचे काम; फोटो केले पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा फॅशन ऑयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (RRKPK) हा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बहुचर्चित या सिनेमामध्ये रणवीर व अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची रोमॅंटिक जोडी पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. या आधी ‘गली बॉय’ (Gully Boy Movie) या चित्रपटात या जोडीने स्क्रीन शेअर केली होती. रणवीर सिंगने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटातील काही शेवटची कामे पूर्ण केली आहेत. याबदद्ल त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे.

सध्या चर्चेत असलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंगने रॉकी रंधावा व अभिनेत्री आलिया भट्ट हिने रानी चटर्जी हे पात्र साकारले आहे. (Ranveer And Alia) प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. अभिनेता रणवीर सिंगने देखील चित्रपटाची राहिलेली सर्व कामे आता पूर्ण केली आहेत. त्याने ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा स्टुडिओ मधला फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये रणवीर त्याचा डबिंग करताना दिसत असून त्याच्यापुढे चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे. हेडफोन घालून रणवीर डबिंग माइकसमोर डबिंग करताना दिसत आहे. या फोटोला रणवीरने कॅप्शन लिहिले आहे की, “फिनिशिंग टच… #RRKPK” तसेच त्याने धर्मा प्रोडक्शनला टॅग केले आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने (Director Karan Johar) केले आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने करण तब्बल 7 वर्षांनंतर दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर व ‘तुम क्या मिलें’ (Tum Kya Mile) हे गाणे रिलिज झाले आहे.
चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त असून यामध्ये रॉकी व रानीची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.
(Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer) रणवीर (Ranveer Singh) व आलियाबरोबर या चित्रपटामध्ये धर्मेंद्र (Dharmendra),
जया बच्चन (Jaya Bachchan) व शबाना आजमी (Shabana Azmi) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
त्याचबरोबर रोनित रॉय (Ronit Roy), सास्वता चटर्जी (Saswata Chatterjee), कर्मवीर चौधरी (Karmaveer Chowdhary),
क्षिति जोग (Kshiti Jog) हे कलाकार देखील असणार आहे. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date)
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट येत्या 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस य़ेणार आहे.

Web Title :  Ranveer Singh | rocky aur rani kii prem kahani ranveer singh completes dubbing for the film shares picture from studio

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा