Video : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची केली ‘बॅट’ने ‘धुलाई’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध मानले जाणारे कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे नुकतेच लग्न झाले आहे. यांच्या लग्नाला अजून वर्ष ही झाले नाही तर लगेच त्यांच्या भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. दीपिकाने चक्क क्रिकेटच्या बॅटने रणवीरची पिटाई केली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये रणवीर सिंगची अशी परिस्थिती दाखविली आहे. ज्याला क्रिकेटचे असे वेड लागले आहे ज्यामुळे तो त्याच्या पत्नीला खूप नाराज करत आहे. त्यामुळे घरी येऊन खूपच मार खाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्वतः रणवीरने एक गमतीशीर कॅप्शन लिहले आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगची क्रिकेटच्या बॅटने पिटाई करताना दिसत आहे. रणवीर सिंह मार खाताना उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करुन रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या जीवनाची कहानी, रील एंड रियल’ याचबरोबर रणवीरने हसण्याचे इमोजी टाकले आहे.’

दीपिका पादुकोण कबीर खानच्या ‘८३’ चित्रपटात सहभागी झाली आहे. जो भारतीय क्रिकेट टीम १९८३ चा विश्व कप विजेता यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीरने कपिल देवची भूमिका साकारली आहे आणि दीपिकाने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटासोबतच दीपिका पती रणवीरसोबत संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ चित्रपटात दिसून आली. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. जसे की, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’. हे चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

 श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

You might also like