Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं अभिनेता रणवीर सिंगच्या ’83’ ची रिलीज डेट पुढं ढकलली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसनं जगभर हाहाकार माजवला आहे. भारतातही याची लागण वाढताना दिसत आहे. फिल्म इंडस्ट्रीसहित सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. कबीर खान दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग स्टारर 83 हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रोलीज होणार होता. कोरोनाच्या भीतीनं आता मेकर्सनी ही रिलीज डेट पुढे ढकलण्यााच निर्णय घेतला आहे.

मेकर्सनी 83 च्या रिलीज डेटबद्दल सांगताना सांगितलं आहे की, आम्ही सध्या सिनेमाची रिलीज डेट होल्ड करत आहोत. कोरोना व्हायरसची स्थिती नॉर्मल झाल्यावर नवीन रिलीज डेट सांगितली जाईल. आम्ही चाहत्यांना सावधानी घेण्याचं अपील करत आहोत.

आधी कॅन्सल झाला होता ट्रेलर लाँच इव्हेंट

83 या सिनेमाचा ट्रेलर 11 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनाच्या भीतीनं ट्रेलर लाँचिंगही रद्द करण्यात आलं होतं. 11 मार्च रोजी ट्रेलर लाँचिंग इव्हेंटही होणार होता. हा इव्हेंटही कोरोनामुळं रद्द करण्यात आला. कबीर खान, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, आणि भारताच लिजेंडरी माजी क्रिकेटर कपिल देव आधी या इव्हेंटमध्ये सहभागी होणार होते.