दीपिका नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री रोमँटिक एनकाऊंटर करते’ : रणवीर

मुंबई : वृत्तसंस्था – रिअल लाइफमघ्ये सारा फक्त रोमँटिक एनकाऊंटर करते असं वक्तव्य करत अभिनेता रणवीर सिंह याने साराचे भरभरून कौतुक केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिका विवाहबद्ध झाले. यानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहे. यामुळे त्यांनी आपले हनीमूनही पुढे ढकलले आहे. असं असलं तरीही दोघं वेळ काढून एकत्र अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत आहेत.

सध्या रणवीर आपल्या आगामी ‘सिंबा’च्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणवीर सिंह आणि सारा अली खानची केमिस्ट्री सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यातून समोर आली आहे. अनेकदा हे दोघं प्रमोशनमध्ये खूप धम्माल उडवून देताना दिसतात. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रणवीर म्हणतो की, “रिअल लाइफमध्ये सारा फक्त रोमँटिक एनकाऊंटर करते.

“सिंबा सिनेमात साराचा एक डायलॉग आहे जिथे ती म्हणते,”अगर आपको एनकाउंटर के टिप्स चाहिए हो तो मुझसे ले लेना”. तिच्या याच डायलॉगवरून मस्करी करताना रणवीर दिसतो.

रणवीर प्रत्येक प्रमोशनमध्ये साराचं कौतुक करताना थांबत नाही. साराची खूप फॅन फॉलोइंग आहे असंही तो म्हणतो. दिग्दर्शक रोहित शेट्टी साराचं वय आणि अनुभव बघता तिला एका लहान मुलीसारखं ट्रिट करतो. पण तिच्या कामामुळे तो खूप खूष आहे. सारा आणि रणवीरचा सिनेमा ‘सिंबा’ लवकरच प्रदर्शित होत आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी साराने ‘केदारनाथ’मधून डेब्यू केला आहे. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली आहे.