Rape In Pune | 19 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्‍या सावत्र मामाला अटक

पुणे : Rape In Pune | घरात झोपलेल्या १९ वर्षाच्या तरुणीवर जबरदस्तीने शरीर संबंध (Physical Relations) ठेवणार्‍या व घरातील लोकांना जिवे मारुन टाकण्याची धमकी (Threat) देणार्‍या सावत्र मामाला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक (Arrest) केली आहे. (Rape In Pune)

याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९२१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३० वर्षाच्या सावत्र मामाला अटक केली आहे. ही घटना मार्च २०२२ मध्ये घडली होती. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा सावत्र मामा आहे.
फिर्यादी या घरी झोपलेल्या असताना त्यांच्या घरात येऊन सावत्र मामाने त्यांच्याशी मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता आरोपीने फिर्यादीस कोणाला काही सांगितल्यास घरातील लोकांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन त्यांनी त्यावेळी तक्रार केली नव्हती. त्यानंतर तो तिला वारंवार धमकावत असल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे (API Suravse) तपास करीत आहेत.

Web Title :-  Rape In Pune | Step uncle rape in pune 19 years old girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Fitness Tips | नेहमी रहायचे असेल फिट तर अवलंबा ‘या’ 5 सोप्या टिप्स, काही दिवसात दिसेल फरक

Rain in Maharashtra | ’या’ जिल्ह्यांत पावसाची तीव्रता वाढणार, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा कहर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबादेत ढगफुटीसदृश पाऊस, धडकी भरवणारे VIDEO आले समोर