Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा कहर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबादेत ढगफुटीसदृश पाऊस, धडकी भरवणारे VIDEO आले समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | आज औरंगाबाद (Aurangabad) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला. औरंगाबादमध्ये एक वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या होत्या. अजूनही 14 वर्षीय मुलगी बेपत्ता आहे. त्यांच्या बचाव कार्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. येथील सर्वच नद्यांना पूर (River Flood) आला आहे. सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुण्यात सुद्धा संध्याकाळी अनेक भागात पावसाला जोरदार (Rain in Maharashtra) सुरूवात झाली आहे.

 

दरम्यान, कुडाळ, सिंधुदुर्गात सुद्धा काल रात्री 1 पासून धुवाँधार पाऊस (Heavy Rainfall) सुरू आहे. येथील अनेक नद्यांना पूर आला आहे. हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

कोल्हापुरात (Kolhapur) पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) 3 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. आज सकाळी 11 च्या सुमारास राधानगरी धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. यानंतर पाठोपाठ तासाबराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडण्यात आले. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी वाढत आहे. (Rain in Maharashtra)

जळगावमध्ये (Jalgaon) आज रविवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला.
जळगाव शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले.
तसेच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातही कालपासून पाऊसाने कहर केला आहे.
आज सकाळपासून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात 16 ही तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

 

अमरावती (Amravati) शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस पडत आहे.
नागरिकांची दाणादाण उडाली आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | heavy rain fall in many district
like aurangabad and sindhudurga

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा