जळगावमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जळगावमधील एका झोपडीत राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटना कोल्हे  हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळ घडली.  या प्रकरणी पोलिसांनी समता नगरमधील राणा सिकंदर या संशयितास ताब्यात घेतले आहे. घडलेल्या घटनेबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f936e958-d2bc-11e8-8564-afc78224ea84′]

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंबीय बांधकाम मजुरीचे काम करतात. कोल्हे  हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळ माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू असून तेथे काम करणारे मजूर कुटुंब झोपडीत राहतात.  हे सर्व कुटुंबीय रोजची कामे पूर्ण करून रात्री झोपले होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास पीडितेच्या वडील आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यांनी नराधमाचा शोध घेतला असता तिथे कोणीही सापडले नाही.

ब्रँडच्या नावाखाली बनावट शर्टची विक्री, एकाला अटक

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, यावर कारवाई करत पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. पीडित मुलीच्या आई -वडिलांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार, ते घराचा दरवाजा नेहमीप्रमाणे आतून बंद करून झोपले होते. मात्र, दरवाजा कोणी उघडला याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. नराधमाने घरातील मोबाईल चोरल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’504b3c89-d2bd-11e8-925d-d366080ef62a’]