Pimpri : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, तरुणाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणा-या एका 24 वर्षीय युवकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. 12 मे 2015 ते 28 नोव्हेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

सुमित सुशांत नाईक (वय 24 रा. माळवाडी, देहूगाव), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने देहूगाव, लोणी काळभोर, तळेगाव येथे दुचाकीवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार करून तिची फसवणूक केली. पीडितेने याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे तपास करीत आहेत.