Rapper Ram Mungase Arrest | 50 खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक, रोहित पवारांचा संताप; म्हणाले – ‘तर हा सरकारचा कबुली जबाबच नाही का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rapper Ram Mungase Arrest | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या 40 आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) केली. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसललं आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) राज्यात स्थापन झालं. यानंतर विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) समर्थकांनी 50 खोके (50 Khoke), एकदम ओके असे म्हणत शिंदे गटाला टार्गेट केलं. काही दिवसांपूर्वी यावर एक रॅपही व्हारल झालं होता. राम मुंगासे असे या रॅपरचे नाव असून या गाण्यात त्याने 50 खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख केला होता. आता रॅपर राम मुंगासे याला पोलिसांनी अटक (Rapper Ram Mungase Arrest) केली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

 

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांचा ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. यावरुन विरोधकांनी शिंदे गटाला ट्रोल केलं. या संपूर्ण प्रकरणावर एका मराठी तरुणाने रॅप बनवला. त्याने आपल्या रॅपमधून शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी ह्या रॅपचा व्हिडिओ शेअर करत या तरुणाला अटक करु नका, असे म्हटले होते.

 

परंतु अंबरनाथ पोलीस ठाण्यात (Ambernath Police Station) तक्रार दाखल झाल्यानंतर आता रॅपर राम मुंगासे याला अटक (Rapper Ram Mungase Arrest) केली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी रॅपर राम मुंगासे याला अटक केली असून त्याला अंबरनाथ पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.

राम मुंगासे याला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे.
आपल्या रॅप साँग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे
या तरुण कलाकाराला 50 खोके या शब्दामुळं अटक होत असेल
तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही,
पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली
तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले.
ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय – आव्हाड
पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
आव्हाड यांनी ट्विट करुन म्हटले, राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून
त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील.
पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते.
50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावं.
50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं.
म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठीशी आहोत.
संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.

 

 

Web Title :- Rapper Ram Mungase Arrest | rapper ram mungase was finally arrested ncp mla rohit pawar expressed his anger and said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र