Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाण्यात मारहाण झालेल्या महिला कार्यकर्त्याची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर (Maharashtra Politics News) टीका केली होती. या टीकेला फडणवीसांनी ‘मी काडतूस आहे, झुकेगा नाही, घुसेगा’ असे प्रत्युत्तर दिले होते. ठाकरे-फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मनसे नेते प्रकाश महाजन (MNS Leader Prakash Mahajan) यांनी दोघांवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

प्रकाश महाजन म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी, उद्या मी बोललो तर महागात पडेल असं काही बोलण्यापेक्षा खरंच काहीतरी बोलावं. महाराष्ट्राच्या जनतेला सर्व काही कळू द्यावं. आमची देखील इच्छा आहे तुम्ही बोलावं. जनतेला कळू द्या, त्यांनी तुम्हाला फडतूस म्हटलंय, तुम्ही बोला नेमकं काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला, असे महाजन म्हणाले. (Maharashtra Politics News)

 

मग एखादी गोळी चालवून दाखवा

महाजन पुढे म्हणाले, एक उडत उडत आलेली माहिती आहे. ही माहिती खरी आहे की खोटी याबद्दल माझ्या मनात शंका आहे अथवा त्याला भक्कम आधार नाही. परंतु मातोश्री 2 (Matoshree 2) बंगल्याचे जे बांधकाम सुरु आहे, त्याचा एफएसआयवर (FSI) काही प्रश्न होते. ते देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले होते. तेव्हा हेच फडणवीस तुमच्यासाठी फूल होते, आता ते तुमच्यासाठी फडतूस झाले आहेत. त्यामुळे फडणवीसांनी आता सांगावं ते खरं होतं की खोटं होतं. ते तुम्हाला फडतूस म्हणतायत आणि तुम्ही जर खरंच काडसूस आहात तर मग एखादी गोळी चालवून दाखवा, असं महाजन यांनी म्हटलं.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | prakash mahajan says devendra fadnavis cleared fsi of matoshree 2 bungalow uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा