ठाकरे घराण्याचा ‘CM’ बनवण्यामागे ‘HM’ चा मोलाचा ‘वाटा’, केलं बाळासाहेबांचं ‘स्वप्न’ पूर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी राज्यात लवकरच सत्तास्थापन करणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार नव्हते असे वृत्त होते परंतू अखेर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असे जाहीर केले. परंतू ते हा पदभार स्वीकारणार आहेत त्यामागे त्यांची पत्नी रश्मी ठाकरेंचा मोलाचा वाटा मानला जात आहे. रश्मी ठाकरे प्रत्यक्ष राजकारणात दिसत नसल्यातरी पडद्यामागे ते महत्वाची भूमिका पार पाडत असतात.

रश्मी ठाकरे फक्त सहचारीणी नाहीत तर उत्तम मैत्रिण, उत्तम सल्लागार म्हणून ठाकरे घरात मोठी महत्वाची भूमिका बजावत असतात. 2014 साली शिवसेना आणि भाजपने वेगळे लढून त्यानंतर एकत्र यावं यासाठी रश्मी ठाकरे यांनी निभावलेली भूमिका महत्वाची होती. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत मित्रपक्षातील वाद दूर करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. परंतू असे काय झाले की युतीत बिनसलं. परंतू युती तुटण्यामागे रश्मी ठाकरेंची भूमिका महत्वाची होती अशी राजकीय वर्तुळात कुजबुज आहे. भाजपकडून सेनेला बऱ्याचदा गोंजारण्याचा प्रयत्न झाला परंतू शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात भाजप तयार नव्हती. त्यामुळे युती तोडल्याचा सल्ला रश्मी ठाकरे यांनीच दिल्याचा कयास मांडला जात आहे.

30 वर्षांची युती मुख्यमंत्रिपदासाठी तोडण्याचा हट्ट रश्मी ठाकरेंचा होता. महायुती तुटल्यानंतर काय होऊ शकतं हे त्यांना माहित होतं. रश्मी ठाकरेंची दूरदृष्टी आणि निर्णय क्षमता यामुळे आज राज्यात ठाकरे सरकार येणार आहे. गुरुवारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. रश्मी यांचा उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक निर्णयात मोलाचा वाटा असतो. उत्तम सल्लागार, अचूक निर्णय, राजकारणातील योग्य दिशा, दूरदृष्टी या सगळ्याच गोष्टींचा रश्मी ठाकरे काटेकोरपणे उद्धव ठाकरेंच्या बाबत पाळतात.

रश्मी ठाकरेंबद्दल काही खास गोष्टी ज्या तुम्हाला कदाचितच माहित असतील –
रश्मी ठाकरे यांचा जन्म दाभोळचा. मात्र त्यांचे बालपण डोंबिवलीमध्ये गेले.

13 डिसेंबर 1988 रोजी त्यांचा विवाह उद्धव ठाकरेंसोबत झाला.

घरी आलेल्या प्रत्येकाचे उत्साहाने स्वागत करणे आणि आदरातिथ्य करुन जनमानसाची योग्य नाळ ओळखण्यात त्या माहीर असल्याचे मानले जाते.

त्यांनी नेत्यांसोबत चर्चा करुन लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याची रणनिती आखली.

उद्धव ठाकरेंबद्दल नकारात्मक बोलेलं त्यांना अजितबात आवडत नाही. त्या स्वत: अत्यंत सकारात्मक विचार करण्याऱ्या दुसऱ्या माँ असा उल्लेख शिवसेना कार्यकर्ते करतात.

दूरदृष्टी, अचूक निर्णय क्षमता आणि उद्धव ठाकरेंसोबत झालेली सल्लामसलत यामुळे कायमच उद्धव ठाकरेंना यश मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यांचे कोणाबरोबरच वैर नाही. अगदी विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत त्या सगळ्यांनाच उत्तम पद्धतीने टॅकल करणं त्यांना सहज सोपं जातं.

रश्मी ठाकरेंचा हा गुण मानला जातो की शांत आणि संयमानं योग्य विचार करुन रणनीती आखणं आणि हट्टाला पेटून ती पूर्ण होईपर्यंत चिकाटी न सोडता त्याचा पाठपुरावा करणे.

त्या कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या कानावर आलेल्या प्रत्य़ेक गोष्टी अथवा प्रसंगाचा उलटतपास करुन निर्णय घेतात.

2010मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा रश्मी ठाकरे यांनीच संभाळली.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींमागे आणि उद्धव ठाकरेंच्या यशामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Visit : Policenama.com